साथ तुझी....!
भाग चार :
" बाबा तुम्ही पण खेळा ना माझ्या बरोबर .." एक चार पाच वर्षाची मुलगी तिच्या बाबांकडे हट्ट करत होती .
बेटा बाबाला काम आहे ना ... प्लिज ...सॉरी ....! कान पकडून तो व्यक्ती म्हणाला .
" कट्टी बाबा ... जा मला नाय बोलायचं " ती मुलगी काहीश्या रागात गाल फुगवून बोलली .
"ओ ऽऽ... ओ ....कोणी तरी रागवल वाटत लाडक्या बाबावर ...! इकडे बघू ...( गुडघ्यावर बसून ) हे बच्चा अस नको ना करू ... मग मी कसं जाऊ कामाला ..? माझी बच्चा शहाणी आहे ना ... मग तिच्या लाडक्या बाबावर अस रुसरणार का ...?
बच्चा मी जर काम केलं नाही तर तुला चॉकलेट कसे देणार ...? टॉय कसं आणणार ..? येताना मी काहीतरी सरप्राइज आणणार आहे ..! तुला हवं आहे का..? "तिने थोडा वेळ विचार केला .
" मला हवंय .. तुम्ही पक्का प्रॉमिस करा ..! " ती मुलगी त्या माणसाकडे तोंड करत म्हणाली .
" येस माय प्रिन्सेस .. पापा लवस यु .." तिच्या गालावर किस करत हलकस डोक्यावर थोपटत तिचे बाबा तिला जवळ घेतात .
" प्रिन्सेस अल्सो लवस् पापा .. " अस म्हणून तीही तिचे इवले इवले हात त्या व्यक्तीच्या भोवती घट्ट केले .
" चला ..! बाय " बाबाला किसी द्या .
आपले लहान लहान हात ती तिच्या बाबांच्या गालावर ठेवत किसी करते .तसे तिचे बाबा कारच्या दिशेनी आपली पावल फिरवत निघतात आणि ही तिच्या बाबाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहते .....
आता हे नवीन कोण ...?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मीरा एकटीच आपल्या विचारात हरवून गॅलरीत बसली होती . बंधनात अडकलेला पक्षी झाली होती ती . प्रत्येकाने तिला स्वतः चा गुलाम बनवलं होत . तिच्या इच्छा तिच्या आवडी निवडी कोणी विचारातच घेत नव्हत . तिची ही काही मत होती ... कोणी विचारणारच नव्हत . आणि माणूस हा असा प्राणी आहे ज्याला दुसऱ्याच्या बंधनात राहणं बिलकुल आवडत नाही . पण तरी ती राहत होती .
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..