दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी परत आले .. खूप थकले होते म्हणून आल्या आल्या झोपी गेले . डायरेक्ट जेवायच्या वेळी ते खाली आले ..
" अरे या तुम्ही कधी आलात ? "
" आज च पहाटे आलो खूप थकलो होतो म्हणून मग अल्या आल्या झोपी गेलो . आणि तुलाही सकाळी डिस्टर्ब करू वाटलं नाही मग म्हणलं , जेवतानाच भेटाव .. "
" काय मग मीरा फिरली का अमेरिका ? "
" हो आई , अहो तिथे काय सुंदर सुंदर जागा आहेत .. म्हणजे ... " ती एक एक गोष्ट सांगत होती .. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अभयच्या मनाला समाधान मिळाले . त्यांनी पूर्ण दिवस आराम केला . दुसऱ्या दिवशी अभय त्याच्या ऑफिसला गेला आणि मीरा ही तिच्या कॉलेजला गेली .
" काय ग बऱ्याच दिवसांनी उगवली . कुठे होतीस ? " तिची मैत्रीण विचारते ..
" अग हे आणि मी अमेरिकेला गेलो होतो तर .."
" Ohhoo हनिमून ... कसा झाला मग हनिमून ? " ती चिडवत म्हणली...
" गप ग! आधी ऐकून तरी घे .. त्यांची मीटिंग होती म्हणून मग ते म्हणाले तू ही चल तेवढीच ट्रीप होऊन जाईल म्हणून मग आम्ही गेलो . आणि हे हनिमून वगैरे असल काही नाही आमच्यात . आम्ही तर साधे नवरा बायको ही नाही . "
" वेट वेट .. म्हणजे ? " तिला समजल नाही ..
मीरा तिला सगळं काही सांगते ..
" OMG ! मीरा तुला वेड लागलं आहे का ? येवढ्या चांगल्या माणसाला तू सोडून देणारं आहे ? "
" अग आमच्या नात्यात ते प्रेम नाही .. आमचं नातं हे जबरदस्ती ने बांधलेलं आहे जे काही वर्षांनी संपेल ही .. आणि तसं ही त्यांचं माझ्यावर प्रेम नाही .. आमच्यात अस कोणतंच नात नाही .. "
" आणि तुझ ? तुझ काय , तुझ प्रेम नाही ? "
" आ... चल ना आपले लेक्चर ही सुरू झाले असतील चल .. " मिराने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही ..
मीरा अभ्यास करताना ही ह्याच गोष्टीचा विचार करत होती ..
" खरंच ह्यांचं माझ्यावर प्रेम असेल तर ... पण विराज ... मी खरंच प्रेमात तर पडत नाहीये ह्यांच्या ..नाही नाही आपण जे ठरवलं आहे ते करायचं आणि मग ह्यांना घटस्फोट देऊन आपण आपल्या मार्गाने आणि ते त्यांच्या .. "
ESTÁS LEYENDO
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..