साथ तुझी.....!
भाग ६ :
सकाळी पटकन तीच आवरून ती कॉलेजला गेली . तिथे विराज बसला होता त्याची नजर तिलाच शोधत होती . आणि त्याला ती दिसली .. घाई घाईत बॅग सावरत कॉलेजच्या गेट मधून आत येत होती . बावरलेली थोडीशी वेंधळी मीरा त्याच्या नजरेस आली . तिने ही त्याला पाहिलं . आणि ती केस सावरत त्याच्या दिशेने येऊ लागली .
" Hi...!!thank you ! " थोडंस स्माईल करत येवढं बोलून ती निघाली .
तो ही पटकन तिच्या पुढे आला आणि म्हणाला....
" Thank you कशाला ...??"
" ते काल मला घरी सोडलं त्यासाठी ."
"Ohh ..! अच्छा ...! मग आज एकटीच ..? "
" हम्म .. अनु ची वाट पाहते . येईल थोड्या वेळात ."
" मग तोपर्यंत बसू . तेवढीच तुला कंपनी ."
ती ही थोडावेळ बसावं असा विचार करून त्याच्या बरोबर बसते . मस्त झाडाच्या खाली कट्टा होता त्यावर दोघे ही बसले होते . खूप शांत आणि थंड वाटत होत . वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर तिचे केस ही हवेत उडत होते . एक बाजूने ती ते मागे ढकलत होती आणि ते परत पुढे यायचे . तो बराच वेळ तिला न्ह्याळत होता . तिला अवघडल्यासारखं वाटू लागलं . त्याचा लक्षात येताच त्याने त्याची नजर दुसरी कडे वळवली .
" मग पुढे काय करणार आहेस ? "
" डॉक्टर बनायची खूप इच्छा आहे . बघू पूर्ण झाली तर चांगलच . तू काय करणार आहेस नेक्सट ? " हळू हळू मोकळ्यापणे बोलत होती ती .
___________________&__
Bhag vachun comments dya ...!
©® Yashaswini
" ममम.... सध्या तरी डिग्री कंप्लीट करणार आहे . बघू मग .."
परत शांतता कोणाला काय बोलावं काहीच समजत नव्हत .
" तुझ्या आवडी निवडी काय काय आहेत ? " त्याने विचारले .
" मला तस पुस्तक वाचायला खूप आवडतात . पियानो वाजवता येतो . आवडत मला वाजवायला . आणि बरच काही येत .... "
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..