साथ तुझी १३

31 0 0
                                    

भाग १३

आज साखरपुड्याचा दिवस उगवला . सगळी कडे धावपळ सुरू होती . ती मात्र पेचात पडली होती . काहीच समजत नव्हत .. तिने त्याची इतका दिवस वाट बघितली .. शोधाशोध केली पण हाती निराशाच आली .

" यार हा विराज ...! "

" काय ग मीरा बोलावलं आहेस ना त्याला . आपल्याकडे आजचा च दिवस आहे फक्त .."

" हा.. अग .. म्हणजे त्याचा फोन लागत नाहीये .. "

" मीरा अग अस बोलू नकोस नाहीतर तुझ त्याच्याबरोबर लग्न होऊ शकणार नाही .."

" नाही आजी माझ खरंच त्याच्यावर खूप प्रेम आहे ..."

तितक्यात तिथे अनु पण आली .

" अग मीरा हे काय आहे तुझ तर विराज वर प्रेम होत ना मग हे काय ...? "

" अनु अग बर झालं तू आलीस अग बघ ना हा विराज फोन उचलत नाहीये कुठे आहे ,काय करतोय .. काही समजत नाहीये . मला त्याला भेटायचं आहे "
अगदी व्याकूळ होऊन बोलत होती ती .

" हो हो मीरा शांत हो आपण बघू तू रडू नकोस .."

" मीरा अग हे काय तू अजून तयार नाही झालीस .. उठ चल आवर लवकर .. अनु मदत कर तिला " तिची काकू रूम मध्ये येत म्हणाली . आज त्या जरा जास्तच खुश होत्या .

" हो हो काकू करते मी तयार तिला ."

मिराने मस्त Orange कलरची साडी नेसली होती . तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होती .
सुंदर अशी केसांची हेअरस्टाईल केली होती पण चेहऱ्यावर  कीलोभरचा मेकअप थापूनही तेज काही दिसत नव्हते .
तसच तयार होऊन तिला खाली आणले . साहिल तर फक्त बघत होता . ती त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिला .. सतत विराजच्या नावाचा जप चालू होता मनात . दोघांच्या ही हातात अंगठ्या दिल्या . ती तर त्याच्याकडे बघत ही नव्हती . त्याने तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातावर अंगठा फिरवू लागली . तिला हे सगळं नाहीस होत होतं .
   त्याने तिच्या बोटात ती अंगठी घातली आणि तिच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागले . ह्या ठिकाणी ज्याला असायला हवे होते तो , ज्या व्यक्तीवर प्रेम केले होते तो तर इथे नव्हताच ... आता तिला अंगठी घालायची होती . तिला समजत नव्हत काय चालू आहे ते .. सगळ काही सुन्न झालं होत आणि तिला तोंड उघडून खर सांगायची परवानगी नव्हती नाहीतर तिला घरातून बाहेर ही काढले असते . सध्या तिला शांत डोक ठेऊन निर्णय घेणं गरजेचं होत ..
     तिने शेवटी डोळे मिटले तर त्याचा चेहरा तिच्या नजरेस पडला आणि तिने पटकन अंगठी बोटात सरकवली . टाळ्यांचा आवाज आला तेव्हा कुठे ती भानावर आली . आणि तिला समजलं की आपण अंगठी विराजच्य नाही तर साहिलच्या बोटात घातली . तशी ती तिथे जमिनीवर कोसळली ..
     
काहीवेळाने

साथ तुझी..! Where stories live. Discover now