साथ तुझी....
भाग १७
सकाळी तिला जरा लवकरच जाग आली . सूर्याची किरणं तिच्या आळसावलेली चेहऱ्यावर पडली तस तिने तिचा चेहरा उशिमध्ये घुसळला . हळूच चेहरा एका बाजूला करून , हलकेच डोळे उघडून घड्याळात पाहिले . एक छान स्मित चेहऱ्यावर आणून ती आळस देत उठली . आणि तयार होऊन खाली नाश्ता करायला आली . अभय ही तिथेच होता .
" बेटा रात्री नीट झोप झाली ना ? काही त्रास नाही ना झाला ? " अभयची म्हणाली .
" नाही काकी छान झोप झाली . "
" अरे बेटा तू काहीतरी घे ना . संगीता हिला पोहे दे ."
" अहो काकी मी घेते कशाला उगाच त्रास मी घेते हाताने . "
तिने नाश्ता प्लेट मध्ये वाढून घेतला ." बेटा अग आणखी थोड घे येवढं कमी खाल्ल तर आजारी पडशील . " अस म्हणून त्याचं तिला वाढू लागल्या . अभय इथे मात्र गालात हसत होता . मिराने ही त्याच्याकडे ओझरते पाहिले तर , तिला तो हसताना दिसला .
" बरं आई आज आम्ही दोघे तिच्या घरी जाणार आहोत . "
मीराचा चेहरा लगेच उतरला आणि हे त्याने बरोबर हेरले ." ठीके ! खर तर मीरा मला तू खूप आवडली . इथेच ठेऊन घ्यावं वाटत आहे पण तुझ्या घरचे देखील तुझी वाट बघत असतील . पण तुला अधून मधून यायचं आहे हा भेटायला ! "
" नक्की येईन .. " ती थोडी ना खुशिने म्हणाली .
" बरं मी निघतो ! आणि मीरा ११ वाजता तयार रहा . "
तिने फक्त मान डोलावली .
नंतर त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या . अशातच अकरा वाजले .त्याने मीराला फोन केला ...
" हॅलो मीरा ! "
" हा .. कोण बोलतंय ? "
" लवकर खाली ये मी गाडी घेऊन आलोय . " येवढं बोलून तो फोन कट करतो .
" यार अजीब माणूस आहे . नाव तरी सांगायचं कमीत कामी . अस कस इगो मध्ये येतो ना मग कस सांगणार ? सतत आपल लोकांना स्वतः च्या तालावर नाचवतो . म्हणतो कसा , ' शार्प ११ ला तयार रहा . मला नाही ऐक्याची सवय नाही . ' " ती एकदम त्याच्या सारखं चेहरा करून बोलत होती . पटापट तयार होऊन ती खाली आली . अभयच्या आईचा निरोप घेतला आणि ती निघाली .
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..