साथ तुझी...!भाग १८ :
विराज त्यांच्या गाडी समोर आला . अभयने पटकन ब्रेक मारला . तसे मिराने समोर पाहिले तर तिला विराज दिसला . डोळ्यातील पाणी पुसून ती पटकन गाडीतून उतरली . अभय ही उतरला . मीराला समोर बघून विराज रडू लागला आणि पटकन पळत येऊन तिला मिठी मारली . दोघेही हमसून हमसून रडत होते . पण मीराला जेव्हा वास्तवाचे भान आले तेव्हा तीने लगेच त्याला दूर केले . अभय वीराजकडे रागाने बघत होता . आता तो का बघत होता रागाने हे त्यालाच माहीत ?
" मीरा मला जरा बोलायचं आहे . " विराज म्हणाला .
" हमम बोल , पण लक्षात ठेव ह्या नंतर काही राहील नाही पाहिजे बोलायला . हे शेवटचं . "
विराज पटकन मिराच्या पायाशी बसला .
" मीरा .. मीरा मी खरंच चुकलो . मला माफ कर ! तुला सोडून मी नाही राहू शकत मीरा . "
" इतके दिवस राहिलास ना . आता ही राहू शकतोस . " ती जड आवाजात म्हणाली .
" मीरा माझं मला माहित आहे मी कसा राहिलो . एक एक दिवस गेला नाही तुझ्या आठवणींन शिवाय . हे बघ मीरा ! " ( तो त्याचे हात दाखवतो ) त्याचे हातांवर सगळीकडे जखमा होत्या . खूप खरचटले होते . ते पाहून तिच तर अवसानाच गेलं . आणि तिचे अश्रू हळू हळू वाहत त्याच्या हातावर पडले . आणि तिच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू पाहून अभयला वाईट वाटलं .
" मीरा मी उगाच तुझ्या काकुचं ऐकलं . "
" म्हणजे ..? " तिने न समजून त्याला विचारले .
तो जे काही घडल ते सगळ सांगतो ." विराज तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली . आणि .. आणि तू एकदाही विचार नाही केलास माझा .! तुला जराही वाटलं नाही माझं काय होईल ? "
" पण मीरा , मीही मजबूर होतो माझ्या परिस्थतीमुळे . तेव्हा मला जे योग्य वाटलं मी ते केलं . मला ही समजल नाही पण जेव्हा तुझ्यापासून दूर राहायला लागलो तेव्हा समजल आपण तर खरंच प्रेमात पडलोय . आजवर मी खूप मुलींबरोबर फिरलो पण , खर प्रेम मला तुझ्यामुळे समजल मीरा . "
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..