साथ तुझी....!भाग तीन
मीरा धावत धावत कॉलेजला पोहोचली . आज तिच्या बरोबर अनु नव्हती . कारण , मीराला जरा उशीर झाला होता म्हणून तीने अनुला डायरेक्ट कॉलेजला जायला सांगितलं आणि कॅन्टीन जवळ येऊन भेट अस सांगितल . मीरा अनुला कॅन्टीन जवळ शोधत होती .
" मीरा ऽ ऽ....! अग इकडे आहे मी . अनुने मीराला आवाज दिला . "
मीरा हे नाव ऐकताच कोणीतरी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. त्या नावाने जणू त्या व्यक्तीचे लक्षच वेधले .
तशी मीरा धावत धावत अनुजवळ आली.
" सॉरी ! आजपण जरा उशीर झाला . जरा घरातलं काम करत होते म्हणुन जरा उशीर झाला . " नाराजीच्या स्वरात उत्तरली .
" ठीके आहे ग आणि तसंही अजून लेक्चर सुरू नाय झाला . पण चल लवकर आता सुरू होईल . "
" हो ..हो ..चल !"
पण .....
पण इथे कोणीतरी होते जे मीरा आल्यापासून तिचे निरीक्षण करत होत .
" ओके स्टुडंट्स , आज पूर्त एवढंच आपण उद्या पुन्हा भेटू..! "
सगळं क्लास रिकामा झाला .
" कसलं भारी शिकवतात ना सर ! ह्यांच्या लेक्चरला खरंच खूप मजा येते . " मीरा जरा उत्साहात म्हणाली .
" होणं अजिबात कंटाळा येत नाही . बरं ऐक ना ! चल जरा खाऊन घेऊ . मला खूप भूक लागली आहे . "
अनु छोटासा चेहरा करत म्हणाली." चल ! खादाड नुसती खात असते . " ह्यावर दोघीही खळखळून हसल्या .
" हम्म तुमच्या घरची हलहवा काय म्हणते ..? " अनुने खात खात विचारले .
"काय म्हणणार .... ? बंधनात अडकलेला पक्षी झाले आहे माझे . नाही कुठे जायची मुभा नाही वर तोंड करून बोलायची सोय ... आजीच काय ती तेवढी सोबत देत असते मला . जाऊदेत चल मी जाते नाहीतर परत काकू रागवेल . वरून संध्याकाळची काम पण आहेत ."
" हम चला .." दोघींनी पटपट खाल्ल आणि निघाल्या .
...........
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..