साथ तुझी ...!
भाग ९
ती तशीच पोटात पाय दुमडून त्यावर डोकं ठेवून झोपली . सकाळी जेव्हा पक्षांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला तेव्हा तिचा डोळा उघडला . रात्री रडत रडतच ती झोपी गेली होती आणि सकाळी केव्हातरी डोळा तिचा लागला हे तिला ही समजलं नाही .
पटकन उठून तिने आधी तोंड धुतले . नशीब आजीच्या आधी उठली नाहीतर आजीने पाहिलं असत तर काकूला तर ओरडा मिळालाच असता सोबत मीराला ही ओरडा मिळाला असता . कालचा घडलेला प्रसंग तिला आजी समोर मांडायचा नव्हता म्हणून तिने पटकन आवरलं आणि किचन मध्ये गेली .
हळू हळू कांदा कापत होती सोबत साथ द्यायला विचार होतेच . तिच्या डोळ्यासमोर कालचे सगळे क्षण उभे राहिले . नकळत काकुचे बोलणे मनाला टोचून गेले . कांदा कापताना तिच्या डोळ्यात पाणी येतं होते पण... पण ते नेमके कांद्यामुळे होती की अजून काही हे तिलाच माहीत ....
" इतक्या हळू हळू कांदा कापल्यावर नाश्ता काय उद्या करायचा का .... ? "काकूचा खणखणीत आवाज कानी पडल्यावर ती वास्तवात परतली .
तिचा आवाज ऐकून मिराणे एक उस्सासा सोडला . आणि आपल्या कामाचा वेग वाढवला ." हो .... काकू झालाच ..... थोडाच वेळ थांबा ... "
" Hmm ....! आता आम्ही तुझ्यासाठी वाट बघायची ... काही खर नाही आमचं ... " काकू नाक मुरडत बोलली .
काकू तशीच डायनिंग टेबलवर जाऊन बसली . नंतर मीरा तीच आटपून कॉलेजला गेली . विरजला तिची नजर शोधत होती . तो कुठे आहे हे पाहत होती . तिलाही समजत नव्हत ती त्याला पाहायला इतकी उतावीळ का होत आहे ते ..... पण आजकाल तो दिसला नाही की तिला बेचैन झाल्यासारखं वाटत होत . शेवटी तो कॅन्टीन जवळ दिसला ती तिथे गेली .
मस्त रुबाबात खुर्चीवर बसला होता . ती त्याला पाहत होती . केस सेट केलेली , मस्त प्रोपर ट्रिम दाढी ... ब्लॅक शर्ट ज्याच्या बाह्य कोपाऱ्या पर्यंत फोल्ड केल्या होत्या . ज्यातून त्याची बॉडी दिसत होती , ब्लू जीन्स ... हातात परफेक्ट घड्याळ ... खूप हॅण्डसम दिसत होता तो ....
त्याने नजर वळवताच त्याला मीरा दिसली . त्याने तिला हाक मारून इकडे ये असा इशारा केला ..
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..