साथ तुझी..भाग २८अंतिम भाग(१)

44 0 0
                                    

अंतिम भाग (१) :

भाग २८

तोच सेम फोटो तिच्या कडे ही होता . त्यामुळे ओळखायला जरा ही वेळ लागला नाही ..

" तुम्ही .. तुम्ही .. माझे ... "

" मीच तुझा बाप आहे . आणि गेले कित्येक वर्ष मी तुला शोधत होतो .. तुझ्या घरच्यांनी तुला माझ्या पासून दूर ठेवल .. "

" बाबा .. तुम्ही .. म .. ला का .. पकडुन ठेवलंय ..  " ती रडत रडत म्हणाली ..

" कारण माझं एक काम आहे तुझ्याकडे .. "

" बाबा .. एक विचारू ... ? आई .. आई कु...ठे आहे ..?  "

" हा ..हा...हा.. तुझी आई .. ममं तुझी आणि तुझ्या आईची भेट मी लवकरच करून देईल .. फक्त माझं काम होऊ देत .. "  तो माणूस क्रूरपणे हस्त म्हणाला ..

" काय आहे जेव्हा तुझ्या आईचे आणि माझं लग्न झाल ना त्यानंतर तुझ्या आईची आणि माझी खूप भांडण होऊ लागली .. तुझी आई उगाच कारण काढून भांडण काढायची .. आणि बऱ्याच लोकांबरोबर तिचे संबंध ही होते .. आणि ... "

" एक मिनिट सूर्यकांत ..खूप झाल बस आता नाही ... इतकी वर्ष तू खूप खोट बोलला , खूप लोकांना तू फसवल .. तुझ्या सगळ्या चुका मी जगापासून लपवून ठेवल्या पण आता नाही ... अजून एका व्यक्तीचा बळी नाही जाऊ देऊ शकत मी .. तुझ खर तिला समजायला हवच ... बस अजून अपराध मी माझ्या डोळ्यांनी नाही पाहू शकत .. " ती बाई खूप गृहणेने त्याला म्हणाली ...

" बरं होईल जायच्या आधी तिला ही समजेल .. तिच्या आई बरोबर काय घडल ? आणि आता तिच्या बरोबर काय होणार आहे ? " अस म्हणून तो हसला .. त्याच्या  हसण्याचा पूर्ण खोलीत घुमला ..

" बेटा मी तुझ्या वडीलाची बहीण .. मला बोलतानाही आता खूप अपराधी वाटत आहे .. काही गोष्टी आहेत ज्या तुला समजायला हव्यात . तुझ्या घरच्यांनी ही तुझ्या पासून त्या लपवल्या आहेत .. सत्य थोड कटू आहे पण तुला समजायला हवं नाहीतर ह्या माणसाची पाप अजून वाढत जातील .. तुझ्या आईला पाहायला आम्ही तुमच्या घरी गेलो होतो .. सूर्यकांत ही होता सोबत .. तुमच्या घरातील श्रीमंती पाहून सूर्यकांत चांगलाच पेटला .. कसं ही करून त्याने तुझ्या आईला त्याच्या प्रेमात पडले . तिचे प्रेम खरे होते पण त्याला त्याची किंमत नव्हती .. ती ह्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती पण ह्याला त्याच काहीच नव्हत .. ह्याच्या खोट्या प्रेमाला ती वेडी झाली होती .. तुझी आई खूप साधी होती .. त्यामुळे सहज त्याच्या जाळ्यात अडकली .. " मीराला तिच्या आईच्या जागी ती आणि तिच्या वडिलांच्या जागी विराजला पाहू लागला .. सगळ्या गोष्टी अगदी जुळत होत्या .. मीरा ही साधी होती . वीराजच्या खोट्या प्रेमात ती ही फसली होती .. ती ही जिवापाड प्रेम करत होती आणि त्याने ही तिचा विश्वासघात केला होता .. एका क्षणात सगळ चित्र तिच्या डोळ्यासमोर उभ राहील . तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले .

साथ तुझी..! Where stories live. Discover now