साथ तुझी..!२६

22 0 0
                                    

भाग २६

दुपारी मीटिंग आटोपून तो रूम वर परत आला ... जेवणं करून ते फिरायला निघाले .. तिने मस्त जीन्स टीशर्ट घातलं आणि त्यावर मस्त शोभून दिसेल अस जॅकेट ही घातलं .. लांब सडक केस मोकळी सोडली होती.. खूप सुंदर दिसत होती ती ..

" बघितल माझी चॉईस कधी चुकतं नाही .. " तो हसत म्हणाला ..

तो ही काही कमी नव्हता .. त्याच्या चेहऱ्यारत एक वेगळीच जादू होती .. कोणी ही हरवून जात होत त्याच्या चेहऱ्यात .. खास करून तर मुली .

त्यांचं आवरून  ते निघाले ..  मीरा तर नुसती वेड्यासारखी पाहत होती .. पहिल्यांदाच अनुभवत होती .. आणि ती बिचारी कुठे हरवू नये म्हणून अभय सारखं तिच्या कडे लक्ष द्यायचं .. तिची काळजी करायचं . तिला प्रोटेक्ट करायचं आणि ही एक बेधुंद होऊन , अभयवर निर्धास्त राहून अमेरिका फिरत होती ..

" मीरा इथे ना मस्त गार्डन आहे आपण तिथे जाऊ .. " अस म्हणून त्याने तिचा हात पकडला आणि तो निघाला .. ती ही त्याच्या बरोबरीने चालू लागली .. गार्डन मध्ये गेल्यावर ते एका ठिकाणी जाऊन बसले . तिथून सूर्यास्त खूप सुंदर दिसत होता ..ते मस्त खाली बसून सूर्यास्त पाहत होते ..

" किती सुंदर सूर्य मावळला आहे ना ... पूर्ण आकाश लाल - केशरी झाल आहे . मी गाणं म्हणून का ? "

" म्हण की ... ! "

" जब कोई बात बिघड जाये,
जब कोई मुश्किल ..... " ती गान गाण्यात गढून गेली .. तिला मुळातच गाण्याची आवड होती .. ती थोडफार शिकली ही होती पण नंतर काकू मुळे तिला तीच गान थांबवावं लागलं .. पूर्ण आकाश सूर्याच्या लाल केशरी रंगाने बहरून निघालं होत ... त्या लाल केशरी छटा मिराच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या . अभय तिच्या चेहऱ्याकडे बघत बसला . तिचे गातानाचे चेहऱ्यावरील शांत भाव , अलवार  होणाऱ्या नाजूक ओठांची हालचाल , वाऱ्यावर उडणाऱ्या केस , तिचे चेहऱ्यावरील प्रत्येक भाव तो टिपत होता .. तिच्या गाण्याने तिथले माहोल मंत्रमुग्ध झाले होते .. तिचे गाणे संपले तसे सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या . ती लगेच आजूबाजूला बघू लागली ..

साथ तुझी..! Where stories live. Discover now