साथ तुझी..! भाग 11

38 0 0
                                    





साथ तुझी...!

भाग ११

इथे मीरा ह्या साऱ्या गोष्टींपासून अभिज्ञ ... तिला ह्या गोष्टींची अजिबात कल्पना नव्हती .वादळ येणार होते तिच्या आयुष्यात . जे तिने कधीच पाहिलं नव्हत त्या साऱ्या गोष्टी अचानक घडणार होत्या .
काकू त्याला भेटुन घरी आल्या . कोणाला काहीच खबर नव्हती . मीरा इथे विराजला सारखा कॉल करत होती . ती त्याच्याशी बोलायला अगदी उतावीळ झाली होती . वेड्यासारखी फोन करत होती फक्त त्याचे शब्द ऐकायला ...! पण तो काही तिचे कॉल उचलत नव्हता .
इकडे काकूने तिचे काम केले होते . त्यामुळे ती आता जरा निवांत होती . तितक्यात मृणाल आली .

" आई काय झाल ..? आज एकदम निवांत आहेस . "

" जेव्हा एखादं काम सराहितपणे पूर्ण होत तेव्हा असच निवांत बसायचं असतं . आपण फक्त एक ठिणगी टाकायची . बाकी आग स्वतः हुन लागते . "

" वा...! अस काय करून आलीस तू की जे एवढी खुश आहेस .. ?! "

" समजेल समजेल .. ! अग तुला माहित आहे का .. ? साहिल येतोय . "

" काय ...? कधी ..? मला सांगितलं नाहीस "

" अग ह्या गडबडीत राहूनच गेलं . "

" कधी येतोय तो .. ? "

" आज संध्याकाळी आणि सोबत एक सरप्राइज पण असणार आहे ... ! " एका कोपऱ्यात शून्यात बघत काकू बोलली ..

इकडे मीरा गॅलरीत टक लावून विचार करत होती . तेवढ्यात एक रॉयल कार त्यांच्या घराच्या आत येताना तिला दिसली . ती एकटक लावून पाहू लागली कोणाची आहे ती कार .. कारचा एक बाजूने दरवाजा उघडला आणि त्यातून एक सुंदर तरुण बाहेर आला . त्याच्या चेहरा पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला . कारण तो साहिल होता .. जो तिच्या भावाचा मुलगा होता . तिला तर काहीच सुचेना ... काकूने लगेच आवाज देऊन तिला खाली बोलावून घेतले . तिला नाविलाजाणे जाव लागलं . मीरा त्याला बघत होती . एक बॅग पाठीवर सॅक कदाचित तो राहायला आला असणार असा विचार करत होती ..

" अग मीरा ..! बघत काय बसलीय जा पाणी घेऊन ये त्याला .. " काकू दातओठ खात म्हणाली ...

साथ तुझी..! Donde viven las historias. Descúbrelo ahora