साथ तुझी..२२

25 0 0
                                    

भाग 22

संध्याकाळी तो घरी येतो ....

मीरा किचन मध्ये मस्त जेवण बनवत होती .. पूर्ण घरात सुगंध पसरला होता .. तो आल्यावर त्याची नजर तिलाच शोधत होती . तर ती त्याला किचन मध्ये काम करताना दिसली . त्याला जरा आश्चर्य वाटले . तो पटकन रूम मध्ये गेला आणि फ्रेश होऊन खाली आला ... पाणी पिण्याच्या बहाणे तो किचन मध्ये शिरला ..
    मीरा मन लावून स्वयंपाक करत होती . ती पीठ मळत होती . तो पाणी पित पित तिच निरीक्षण करत होता . तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या बटा त्यांना मागे करताना होणारी तिची ओढाताण , तो पाहत होता . पीठ मळताना तिचा पदर मात्र सारखं हातावर यायचं . आणि तिचा हात भरलेला होता म्हणून तिला तो मागे ही करायला जमत नव्हत . खूप वेळा तस झाल्यावर अभय तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला . त्याला पाहून तिने हलकेच स्मित केले . तो तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि तिचा पदर त्याने तिच्या कंबरेत खोचला . त्याच्या झालेल्या बोटाच्या स्पर्शाने तिने तिच पोट तिने आत ओढून घेतले . त्याने पटकन पदर खोचून हात मागे घेतला . आणि तिकडून जायला वळला .

" आ. आ... Thank you ! " ती कस बस म्हणाली आणि तीच काम करू लागली .

तो ही त्याच्या खोली निघून गेला आणि त्याच काम करू लागला . नंतर सगळे एकत्र जेवायला बसले .

"अभी आज लवकर आला बर झाल .. नहीतर आपल्याला अस बसून गप्पाच नाही मारत येत ... "

"हो आई .. आज लवकर काम संपल मग म्हणलं , लवकर यावं . "

" मीरा ने सांगितलं तू तिच एडमिशन करून दिलस हे चांगल केलं बघ .."

" अग तिला येवढे चांगले मार्क्स मिळाले आहेत आणि तिची शिकायची इच्छा ही आहे म्हणून , मग केलं एडमिशन . "

" बाकी मीरा तुझ्या हाताला चव आहे बर .. खूप सुंदर जेवण बनवल आहे .  बऱ्याच दिवसांनी वेगळी चव चाखायला मिळाली आहे . " त्याची आई म्हणाली ..

" हमं खूप स्वादिष्ट झाल आहे . तू पण घे ना ... " तो तिला ही वाढू लागला ...

" अहो घेते मी . तुम्ही जेवा " थांब मी वाढत आहे तू बस .. अस म्हणून तो तिला वाढू लागला ..

साथ तुझी..! Donde viven las historias. Descúbrelo ahora