साथ तुझी..! भाग २

153 0 0
                                    

साथ तुझी ....!

भाग : २

    "  माझ्या पोरीला ओरडायचा अधिकार कोणालाच नाहीये . आणि खबरदार ..! जर कोणी तसा प्रयत्न जरी केला तर ... त्याला बाहेरचा रस्ता मोकळा आहे . " कडकं आवाजात आजी गरजली .
 
बिचारी आपली मीरा आजीच्या मागे लपून उभी राहिली  होती . आजीच तिचा कायतो त्याघरातील एकमेव आधार होता .
बाकी सगळे तिला खूप त्रास द्यायचे . आजीला माहीत असायचं की आपली मीरा खूप साधी आहे . सगळ्यांनी बोललेल निमुटपणे सहन करत असते . कोणी कितीही काम दिलं तरी ती बिचारी गपगुमान पडेल ते काम करत राहायची . कधी कोणाच्या विरोधात एक वाईट शब्द ही निघाला नसेल . पण ... पण ते सगळे तिला घरातील एक मोलकरीण असल्या सारखं वागवायचे ....

         तर ... तर ही मीरा राजे . वय फक्त १८. मध्यम उंची , सडपातळ बांधा , गोरापान वर्ण , मोठे मोठे काळे टपोरी डोळे ज्यात नेहमी काजळ भरलेलं असायचं , लांब कंबरेपर्यंत रुळणारे काळेभोर केस , देखणी होती .. चांगली श्रीमंत ही होती पण , घरच्यांनी तिला नेहमी नोकर लोकांसारखी वागणूक दिली होती . तिच्या पाठी तिचे आईवडील ही नव्हते . आजीच ( ताराबाई ) तिचा काय तो आधार ... कुटुंब तस मोठ होत . काका - काकू ( सारिका - रमाकांत ), त्यांना दोन मुलं होती . एक मुलगा  आणि त्याची बायको ( अजिंक्य - सानिका ) ज्याच लग्न झाल होत . पण त्याला नुकतीच बाहेर देशात नोकरी लागली होती म्हणून तो तिकडे होता पण त्याची बायको इथेच होती . आणि एक मुलगी (मृणाल) आणि ती अस त्यांचं एकत्रित कुटुंब .

      " मीरा आत जा तू आणि जर तुला कोणी काहीही बोलले तर लगेच मला सांगायचं मग मी बघते . " मिराने ह्यावर फक्त मान डोलावली . तिची नजर अजूनही खालीच होती .

   "  चल आत .." आजीच्या पाठीपाठी मिरा तिच्या खोलीत गेली . आजी आणि ती एकाच खोलीत राहत होत्या .

मीरा रूममध्ये आल्या आल्या आजीला बोलू लागली .

  "  काय ग आजी कशाल उगाच त्यांना बोललीस ? अग मी त्यांची थोडीफार काम केली तर काय बिघडते ? माझ्यामुळे कशाला कोणाला उगाच त्रास ..? " मीरा खोलीतील पसारा आवरत बोलत होती .
  
   " मीरा इकडे ये ..... बस इथे . ( आजीचा आवाज जरा शांत होता . ) पोरी तुला माहित नाही ही लोक ... अग तू त्यांना अशीच सूट देत राहिलीस तर तुझ जगणं ही मुश्किल करतील . मी आहे म्हणून तुला बाहेर  जाऊ देतात ,  फिरू देतात . त्यांच्या समोर बोलण्याचे स्वातंत्र्य तर नाहीच तुला पण मी आहे म्हणून थोडफार बोलू तरी  देतात . बाळ .. ! मी आता आहे म्हणून तू सुरक्षित आहेस . पण ....
पण मी ही जास्त दिवस नाही आता ..." आजीच स्वर जरा कापरा झाला होता .

साथ तुझी..! Where stories live. Discover now