साथ तुझी... !
भाग १२
सकाळ सकाळी मीरा उठून किचन मध्ये आली तीच काम करू लागली . सर्वांसाठी तिने मस्त नाश्ता बनवला आणि तिने सगळ्यांना तो दिला . सगळे जमले साहिल , काकू काका , आजी ..
" अहो बोलाना .. " मिराची काकू जरा हळू आवाजात म्हणाली ..
" मग मीरा बेटा आमच्या जीवावर बसून शिकतेस कस चालू आहे कॉलेज जातेस का नाही एवढा पैसा भरलाय .. " मिराचे काका म्हणाले..
" रमाकांत काय बोलत आहेस .. ? तोंड सांभाळून मी इथेच बसली आहे हे विसरू नको ... " आजी म्हणाली ..
मीराला जरा वाईट वाटलं तिचे काका ही तिला आशीच वागणूक द्यायचे .
" चालू आहे काका एक्साम आहेत म्हणून सुट्ट्या दिल्या आहेत .. " तिने जरा नाराजीने उत्तर दिले .
" मी काय म्हणतो आता बस झाल शिक्षण आणि तू तशी ही अठरा पूर्ण झाली आहेस त्यामुळे तुझे लग्न लावून द्यायला हरकत नाही . "
" रमाकांत अरे पोरगी अजून शिकते इतक्यात कशाला हवं आहे लग्न . तिला अजून शिकायचं आहे तर शिकू देत की आणि हे काय वय आहे का .. ? "
" अग आई हेच वय आहे नंतर कोणी ही हिला मुलगा देणार नाही आणि सासरी जाऊन देखील ही शिकुच शकते .. "
" पण काका माझी अजून बारावीची परीक्षा ही नाही झाली ..."
" काय करणार देऊन ...?"
" नोकरी तर करूच शकते ना आणि काका आताच्या काळात डिग्री असेल तरच नोकरी देतात . "
" हा म्हणजे आमचे पैसे अजून बरबाद करणार तू ... !"
" काका अस का म्हणताय .. ? " त्यांचे बोलणे आता सहन होत नव्हते . तिच्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागले ... आणि परत एकदा तिला जाणीव झाली किती ही झाल तरी आपल्या आईवडिलांची जागा शेवटी कोणीच घेऊ शकत नाही ..
" मीरा ऐक माझ्या नजरेत एक मुलगा आहे साहिल...! हो साहिल खरंच चांगला मुलगा आहे . आणि मी तुझ लग्न त्याशी ठरवत आहे .. "
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..