साथ तुझी..! २०

28 0 0
                                    

      
भाग २० :

   दुसऱ्या दिवशी हळद होती . हळदीचा हा कार्यक्रम आटोपला आणि नंतर त्यांच्या लग्नाचा दिवस उजाडला .
मीरा नव्या नवरी प्रमाणे नटली होती .  तिने सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसली होती . केसांची छान हेअरस्टाईल करून अंबाडा बांधला . हातात हिरवा चुडा , त्याच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर सुंदर दिसत होती .
      तिचा मराठमोळा साज शृंगार पाहून तो तर तिला वेड्यारखा पाहत होता . पण मध्ये धरलेला अंतरपाठ त्यांच्यातील नजरा नजर अडवत होता .. ती ही त्याला चोरून चोरून पाहत होती .. सुंदर अशी शेरवानी घातली होती .. त्याच्या गोऱ्या आणि परफेक्ट चेहऱ्यावर बांधलेल्या मुंडावळया त्याचा चेहरा आकर्षित बनवत होत्या... सर्वात सुंदर त्याची ती स्माईल ... ज्याच्या कोणी ही प्रेमात पडेल ...
    मंगलाष्टके झाले . आणि त्यांच्यातील अंतरपठ हटला ... नंतर एकमेकांनी हार घातले मग त्यांचे विधी सुरू झाले . त्यांनी तिला मंगळसूत्र घातल आणि आज पासून ती मीरा अभय वर्तक झाली होती ..
     नंतर सगळे विधी झाले ते घरी आले ... गृहप्रवेश ही झाला . सगळे खूप दमले होते पटकन जेवून झोपायला गेले .. मीरा मात्र एकटी बसली होती .. आज तिचं लग्न झाल होत . ते ही इतक्या लवकर त्यामुळे ती तिच्या नशिबाला दोष देत होती .. ज्याच्या बरोबर सात फेरे घ्याचे होते तो सोबत नव्हताच .. ज्याची आयुष्यभरासाठी साथ मागायची होती आणि फक्त त्याचच बनून राहायचं होत पण तो तर सोडून गेला होता ... आज पासून ती एका अनोळखी आणि नवीन व्यक्तीबरोबर  तीच आयुष्य वाटणार होती .. परत नवीन व्यक्तीची साथ , नवीन सहवास .. आणि आयुष्यातील एक नवीन वळण ...
      दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली . आजपासून आता मीराला अभय बरोबर रहायचं होत .. 
तिने तिचे समान त्याच्या खोलीत शिफ्ट केले .  त्याची रूम खूप मोठी होती .. ऐसपैस होती .. मधोमध एक किंग साइज बेड . आतल्या बाजूला वाड्रोब होते . त्याला एक वेगळी रूम होती . तिकडे तिने जाऊन तिचे कपडे लावले.  
नंतर ती मस्त आवरून साडी नेसून एका सोफ्यावर बाजूला बसली . मनात हजार प्रश्न .आज त्याला यायला जरा उशीर झाला ... तो ऑफिस वरून आला ... वैतागून त्याने टाय लूज करत दार उघडले .. त्याचा अवतार बघून तिला हसूच येत होत .. विस्कटलेले केस , इन बाहेर निघाली होती .. एक हातात ब्लेजर ...
तो दार उघडून आत आला आणि पाहतो तर मीरा सुंदर साडी नेसून त्याच्या समोर बसली होती .. तो आला हे पाहून ती उभी राहिली ..

साथ तुझी..! Where stories live. Discover now