साथ तुझी..!
भाग १४
हो तो विराजच होता .. तिला तर शॉकच बसला त्याला पाहून .. रोहितला समजत नव्हत तिला काय सांगावं ..
" रोहित तुला माहित होतं तर का नाही सांगितलं मला ... ?"
" काय यार रोह्या कोण ... " विराज जरा वैतागत बाहेर आला .. आणि पाहतो तर मीरा नवरीच्या अवतारात केस मोकळी होती , रडून रडून चेहरा लाल झाला होता .. खूप वाईट अवस्था झाली होती त्याला ही तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटलं ... पण त्याला स्वतः ला अस कमजोर पडून चालणार नव्हत .. ती आत आली आणि जोरात सणसणीत कानाखाली ठेऊन दिल्या आणि मोठमोठ्याने रडू लागली .. त्याचा शर्ट हातात पकडुन म्हणाली ..
" विराज अरे कुठे होतास तू किती शोधल मी तूला ...? तुझा फोन ही बंद येत होता काय झाल होत तुला .. ? बरा आहेस ना तू .. ? " ती गडबडीने त्याला पाहू लागली त्याला कुठे लागले आहे का ते ..
" मी .. मी ठीक आहे .. मीरा " तो तिला दूर लोटत म्हणाला ..
" काय झाल आहे विराज एकदा सांग .. ? अस का वागत आहेस .."
त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सगळ खरखर सांगायचं ठरवलं ..
" मी आता जे सांगेल कदाचित त्याने तुला खूप त्रास होईल पण मी अजून खोटं नाही बोलू शकत .. हे बघ मीरा माझ तुझ्यावर कधीच प्रेम नव्हत .. मला फक्त ..तू .. एक टाइमपास म्हणून हवी होतीस .. "
हे ऐकून ती तर पूर्णतः हदरलीच .. डोळ्यातून फक्त घळा घळा पाणी वाहत होते . आणि ती शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती .
" मी आजवर तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही मीरा .. "
" तू विसरलास का आपण ठरवलं होत लग्न करणार आपण तू ... तू मला तस वचन ही दिलं होतस ..विराज हे सगळ खोटं आहे ना तू मस्करी करत आहेस ना .. ? " तिने जरा भित भित हसत विचारले ..
" ए मीरा मी येवढं बावळट नाही की लग्न , प्रेम ह्या गोष्टींची मस्करी करेल .. माझं खरंच तुझ्यावर प्रेम नाही तुला समजत नाही का .. ? " आता त्याचा आवाज वाढला होता ..
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..