साथ तुझी...!भाग ७ :

68 0 0
                                    


साथ तुझी.....!

भाग ७ :

संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर सगळी जन घरी जात होती . मीरा आणि विराज एकतरच निघाले . हळू हळू गप्पा मारत जात होते . आज विराजने गाडी नव्हती आणली . त्यामुळे दोघेही चालत जात होते . एकमेकांचा सहवास अवलंबत होते . एकाच वाटेवरून दोघेही चालत होते .बहुतेक आयुष्याची नवी सुरुवात करत होते . शब्द जरी नसले तरी भावना , सहवास अनुभवत होते .

   अबोल मीरा न जाणे कसं पण तिला विराजच जवळ असणं , काळजी घेणं  सुखावत होतं . कोणीतरी आधार आहे आपला अस तिला वाटायचं . कदाचित आवडू लागलं होत तिला .

असेच थोड्याफार गप्पा मारत दोघे आपापल्या घरी गेले . मीरा ही तीच काम आवरून अभ्यासाला बसली . परीक्षा जवळ आल्या होत्या .

असेच दिवस जात होते . त्यांच्यात हळू हळू मैत्रीचे नाते फुलत होते . सोबत परीक्षा ही सुरू होत्या . प्रत्येक जण मेहनत घेत होता .

त्यांचं मैत्रीचं नातं ही छान रंगत होत . मीरा बऱ्या पैकी बोलकी झाली होती .

त्यांच्या परीक्षा ही संपल्या होत्या . आज शेवटाचा पेपर होता . तो ही संपला . सगळे कॅन्टीन मध्ये येऊन गप्पा मारत बसले होते . आपली मीरा ही तिच्या मित्रमैत्रिणी बरोबर बसली होती .

"मी काय म्हणतोय .. ऐका जरा माझ ..." रोहित म्हणाला .

" बोल ..!" थोड त्रासिक नजरणे अनु उत्तरली .तीच आणि त्याच कधी एकमत होत नव्हत . म्हणून दोघे जास्त बोलत नव्हते .

" मी काय म्हणतोय आपल्या exams पण संपल्यात तर आपण कुठे तरी बाहेर फिरायला जाऊयात का ? "

रागात तिच्या कडे बघतच रोहित बोलला.

" हो चालेल ना .." साक्षी आणि विजय बोलतात .

" कुठे जायचं पण ..? " विराज विचारतो .

" गोव्याला तर कोणी सोडणार नाही . इथे जवळ आसपास जाऊ ." रोहित बोलतो .

" Waterfall ...! किंवा  अलिबाग डायरेक्ट समुद्र ..!"

" अलिबाग ..."

साथ तुझी..! Where stories live. Discover now