साथ तुझी.....!
भाग ८
ते सगळे अलिबागला पोहोचले . त्याने होटेल मध्ये सगळ्यांसाठी रूम बुक केल्या होत्या . मीरा अनु एका रूम मध्ये होते साक्षी आणि मोना एक रूम मध्ये . आणि बाकी मुलांनी कॉमन एकच रूम बुक केली होती . एकाच दिवसाचा प्रश्न होता म्हणून कोणी वेगळी रूम घेतली नाही . त्यांनी पटकन त्यांचं सामान ठेवलं आणि सगळे बिचच्या दिशेने धावू लागले . मस्त एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते . मिराही मनमुरादपणे खेळत होती . जणू आज ती मुक्त झाली होती . हसत खेळत होती . कोणत्याच बंधनात नव्हत ती आज . तिच्यातील अल्लडपणा विराजला जाणवत होता . एवढी अबोल मुलगी आज एवढी बिनधास्तपणे खेळत होती . त्याला नवल वाटत होत .
खूप बारकाईने तो तिला न्याहाळत होता . लहान मुलांसारखी खेळत होती पाण्यात . तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून नकळत त्याच्या ही चेहऱ्यावर हसू उमटत होते . तिला सगळ्या जगाचा विसर पडला होता . तिच्याच छोट्याश्या विश्वात रमली होती . थोड्यावेळाने तिची नजर विराजला शोधू लागली . तिची नजर त्याला शोधत होती . तो दिसताच ती त्याच्याकडे धावत गेली .
" विराज ..... ! एकटाच का बसला आहेस ..? " धापा टाकत आल्यामुळे तिला जरा दम लागला होता . गुडघ्यावर हात ठेवून थोडी खाली वाकून हाफत बोलत होती ..
" नाही मी इथेच ठीके ..तू जाणं तू एन्जॉय कर ... "
" अस कस ...! कपाळावर हलक्या अठ्या पाडत ती म्हणली . "
" अग खरंच नको तू जा ... "
तिने त्याचं काहीच ऐकलं नाही . शेवटी त्याचा हात घट्ट पकडुन त्याला थोड ओढतच ऊठवल आणि त्याचा हात पकडत लाटांच्या दिशेने चालू लागली . तो तर फक्त तिला पाहत होता . निर्जीव असल्यासारखं फक्त तिच्यावर अवलंबून चालत होता . ती त्याला लाटांच्या दिशेने खेचून नेत होती . ते तिथे येऊन थांबले . त्यांच्या पायाला लाटा स्पर्शून जात होत्या .
तिने हलकेच ओंझळीत पाणी घेतले आणि त्याच्या तोंडावर उडवले . तेव्हा कुठे तो वास्तवात परतला . आणि त्याच्या वेड्यापणावर गालात हसला . मग तोही तिच्या अंगावर पाणी उडवू लागला .
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..