साथ तुझी..!२३

22 0 0
                                    

भाग २३

         दुसऱ्या दिवशी मीरा लवकर उठली . तिने काल त्यांच्या मध्ये उश्या लावल्या होत्या म्हणून आज ती तिच्या जागेवर होती . सकाळी पटकन उठून तिने तिचे आवरले मस्त अबोली रंगाची साडी नेसली होती . नंतर तिने देवाची पूजा केली आणि मग किचन मध्ये येऊन ती नाश्ता बनवू लागली . इकडे अभय ही उठला पण समोर मीरा दिसली नाही हे पाहून त्याला जरा उदास वाटले . दिवसाची सुरुवात तिच्या चेहऱ्याकडे बघून व्हायची . पण आज ती त्याच्या आधी उठली होती .

" चला अभय सर .. आपल्याला ती नेहमी दिसेलच अस नाही आता पासून सवय लावून घ्यावी म्हणजे नंतर जड जाणार नाही .. " तो उठून मग अंघोळ करायला गेला . अंघोळ करून बाहेर आल्यावर पाहतो तर मीरा बेड वर बसून काहीतरी करत होती ..
    त्याचा तो सुगंध तिच्या नाका पर्यंत जातो आणि ती झटकन मान वर करून पाहते . तर तो फक्त पँट वर होता .. त्याच्या केसातून पडणारे थेंब त्याच्या अंगावर पडत होते .. त्याची गोरी पाठ पाण्याच्या थेंबाने भिजून निघाली होती ... समोर आलेले केस तो एका हाताने मागे करतो . आणि त्याचे पाणी तिच्या चेहऱ्यावर उडते तेव्हा ती भानावर येते . आपण मागास पासून त्याला अस एकटक पाहत होतो हे समजल्यावर तिला जरा लाजल्यासारख झालं ..

" मीरा प्लीज पटकन माझा शर्ट देशील का काढून ? आज जरा मला लेट झाल आहे म्हणून सांगितल .."

" प्लीज कशाला म्हणता ? देते मी .. " ती पटकन त्याचा शर्ट घेऊन येते आणि त्याच्या हातात देते ..

" थँक्यू यार ! " तो तिला हसत म्हणाला . क्षणभर ती त्याच्या हसणाऱ्या चेहऱ्यात हरवून गेली .

" आ .. ते .. ! "

" काय झाल काही बोलायचं आहे का ? " तो त्याच्या शिर्टची बटण लावत म्हणाला ..

" आ..ते आज माझ्या कॉलेजचा पाहिलं दिवस आहे ना मग तुम्ही येणार ना सोडायला .. "

" Ohh शीट ! सॉरी खरंच सॉरी , मी विसरून गेलो . काय झाल आज मला जरा लेट झालं उठायला . सो मला खरंच खूप उशीर झाला आहे . मी तुला उद्या सोडतो . Ok चल बाय .. "  त्याच आवरून झाल आणि तो खाली निघून गेला ..

साथ तुझी..! Where stories live. Discover now