भाग १५
तो तिला तिच्या घरी घेऊन आला ...
" आई पाणी दे हिला आणि शांत बसव मी आलोच रेडी होऊन ... "
" अरे अभी पण ही आहे कोण ..? "
" सांगतो मी .." तो जिना चढून धावत त्याच्या खोलीत गेला ...
" बाळा तू बस इथे निवांत .. "
ह्यावर मिराने काहीच प्रतिक्रीया दिली नाही .
" संगीता पाणी घेऊन ये जरा . "
संगीता त्यांची मेड पाणी घेऊन आली आणि मीराला दिले . मीराने घटाघट पाणी संपवले . अर्ध पाणी तर अंगावरच सांडल होत . पाणी पिल्यावर तिला बरं वाटलं .
" थँक्यू ..! " ती एकदम हलक्या स्वरात म्हणाली . कसेबसे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले .
" बेटा अग सावकाश पाणी पी .. आणि बसून पी . तुझ नाव काय आहे ? हे बघ तू खूप थकलेली दिसत आहेस. अग चक्कर येऊन पडशील त्यापेक्षा थांब जर . "
" नाही नाही मी जाते आता . " अस म्हणुन ती निघाली .
" अस कस तू मला तुझ नाव ही नाही सांगितलं ? "
" मी मिरा राजे .. "
अशाच त्यांच्या गप्पा सुरू झाल्या . त्यांनी कसतरी तिला कंविंस करून थांबवलं . मीरा त्यांना खूप भावली . अगदी साधी सरळ , बोलण्यातील मावळपणा . नाहीतर श्रीमंत मुली अगदी आगाऊ असतात असा त्यांचा समज होता पण तो मिराने दूर केला .
" आई हिला खोलीत घेऊन जा आणि काय खाल्लं नाही जेवण पण वाढ त्यांना . " अभय पायऱ्या उतरत तिच्याजवळ येत म्हणाला .
" नाही नको मी येते आता . तुमच्या फार उपकार आहेत . येते मी आता ." ही थोडीशी लाजिरवाणी होत म्हणाली .
" ऐका माझं मला तुम्ही थोड्या अशक्त वाटत आहात त्यामुळे तुम्ही थांबा खाऊन घ्या . "
" हो बेटा अभय बरोबर बोलतोय . "
आता तिला त्यांचा आग्रह मोडणं मुश्किल झालं होतं . तिचं नाव विलास झाला आणि तिला थांबावच लागल .
YOU ARE READING
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..