साथ तुझी..!१६

21 0 0
                                    



भाग १६

संध्याकाळी तो जरा लवकर आला . आणि आल्या आल्या आईला गुड न्यूज सांगितली . आपल्या मुलाचं घवघवत यश पाहून त्यांना खूप बरं वाटलं . आज मस्त त्यांनी त्याच्या आवडीचे जेवण बनवायला सांगितलं . आणि फ्रेश व्हायला तो त्याच्या खोलीत गेला . त्याच्या खोलीच्या शेजारीच मीराला खोली दिली होती . तर तिच्या खोलीचं दार फक्त पुढे ढकलल होत . जाता जाता त्याला ती खोली उघडी दिसली म्हणून त्याने हळूच डोकावून पाहिले तर आत मीरा निवांत झोपली होती आणि त्याच्या लक्षात आल की आपणच हिला थांबवून घेतलय . तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे लांबून बघत होता . थकलेला चेहरा , सुजलेले डोळे पाहून त्याला खूप वाईट वाटले . चेहऱ्यावर काही केसांच्या बटा रेंगाळत होत्या . ते पाहून तो गालात हसला .
       तो तसच दार लोटून त्याच्या खोलीत गेला . मस्त फ्रेश होऊन काम करत बसला . तेवढयात मीराला ही जाग आली . तिला आता खरंच खूप बरं वाटतं होत . तिने फक्त पंजाबी ड्रेस घातला होता . अभयच्या आईने तिच्यासाठी काही कपडे मागवली होती . तीने त्यातलाच एक ड्रेस घातला होता . रात्री जेवायला सगळे एकत्र जमले . सगळ काही आज अभयच्या आवडीच होत .

" अरे वा आज सगळ काही माझ्या आवडीच बनवलं आहे . आज तर मजा येणार . " तो अगदी लहान मुलाप्रमाणे वागत होता . तो पटकन येऊन चैरवर बसला त्याच्या बाजूला त्याची आई बसली आणि त्याच्या बरोबर समोर मीरा बसली . संगीता सगळ जेवण टेबलवर ठेऊन निघून गेली .

" आता कस वाटत आहे तुम्हाला .. ? " त्याने खात खात तिला विचारले .

" सकाळ पेक्षा आता खूप बरं वाटतं आहे . तुमचे खरंच आभार मला तुम्ही तुमच्या घरी राहायला दिलं . "

" अरे बेटा आभार कसले मानतेस . " त्याची आई ( रोहिणी ) म्हणाली . त्यानंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या .पण मीरा गप्पच होती . हो नाही येवढं उत्तर देऊन शांत बसायची .

" बरं माझं जेवण झालं आहे तुम्ही जेवा . मला औषध घ्याची आहेत . आणि अभी तिला काही हवं असेल तर दे . बेटा तू निवांत जेव काही लागलं तर नक्की सांग . "
तिने फक्त मान डोलावली

साथ तुझी..! Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang