भाग २१
रात्री दोघे बीड वर झोपले ....
मध्यरात्री तिला अचानक थंडी वाजू लागली .. कधी एसी ची सवय नव्हती . श्रीमंत जरी असली तरी तिची अशी वेगळी खोली नव्हती . त्यामुळे तिला ह्या सगळ्याची सवय नव्हती . ती झोपेत चुळबुळ करू लागली , तशी अभयला जाग आली .. त्याने पाहिलं तिला थंडी वाजत होती ..त्याने एसी च तापमान कमी केलं . आणि उठून तिच्या अंगावर चादर टाकली .. तो थोड खाली वाकून बेडच्या कोण्यावर हात ठेवून तिचा चेहरा पाहत होता .. लांब दाट पापण्या मिटल्या होत्या .. केस थोडी चेहऱ्यावर आले होते .. त्याने हात लावून मागे करायचं प्रयत्न केला पण तिने लगेच चेहरा एका बाजूला केला . मग त्याने पटकन हात मागे घेतला आणि गालात हसला .
" किती निरागस आहेस तू मीरा .. तुझ्या चेहऱ्यावर कडे पाहिलं की सगळ काही विसरतो मी . अगदी स्वतः ला ही . पण तुझ्या बरोबर हे अस काही व्हायला नको होत . किती त्रास सहन केला आहेस तू .. नाही ! पण आजपासून तुझ्यात आयुष्य मी फक्त सुख आणि सुखच देईल .. तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देईल .. नेहमी स्वतः ला कमी समजणारी मीरा तुला उद्या पासून तुझ्यातील नवीन मीरा दाखवणार ... " तो मनात बोलत होता . नंतर परत तो जाऊन झोपला ...सकाळी झाली आणि पक्षांच्या आवाजाने तिला जागं आली पण तिने डोळे अजून उघडले नव्हते .. ती डोळे बंद ठेवून उठत होती पण तिला जमतच नव्हत .. उठता येत नव्हत . तिचा हात कशाच्या तरी खाली दाबला गेला आहे हे समजताच तिने खाडकन डोळे उघडले तर , ती अभयला मिठी मारून झोपली होती .. तिने पहिलं तिचा हात त्याच्या खाली अडकला आहे . तिने उठण्याचा प्रयत्न केला पण ती त्याच्या छातीवर आदळली . तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर आले आणि त्याला जाग आली . त्याने पटकन तिच्या कंबरेला पकडले .. तिचा चेहरा इतक्या जवळ पाहून त्याला काहीच सुचले नाही .. तो तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यात हरवला आणि इथे मीरा मात्र अगदी कावरीबावरी झाली होती .. तिचा पूर्ण गोंधळ उडाला होता .. तिच्या केसांच्या बटा त्याच्या चेहऱ्याला गुदगुली करत होत्या .. त्याने प्रेमाने तिची केस मागे केली ..
ESTÁS LEYENDO
साथ तुझी..!
Romanceही एक प्रेमकथा आहे . अनोळखी लोकांमध्ये फसलेली ती ! आणि तिला नकळत पणे भेटलेला तो! दोघेही एकमेकांचा कसा आधार बनतात आणि एकमेकांना साथ देतात .. तिला कोणीतरी हक्काचं भेटत आणि ती 'साथ तिची !' कायमची बनते ..का नाही ? ..