1: जन्मापासून सुरुवात

506 1 0
                                    

(सूचना: लेखकाचे मनोगत तसेच प्रकाशनपूर्व आलेल्या मान्यवरांच्या काही प्रतिक्रिया, प्रस्तावना हे पुस्तकात मुद्दाम शेवटी दिलेले आहे. कथा वाचण्याआधीच त्याबद्दलचे रहस्य वाचकांना कळू नये हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून ते कथा वाचून झाल्यावरच वाचावे असे लेखक सुचवतात. ही एक काल्पनिक कथा असून यातील घटना, स्थळे, व्यक्ती, नावे काल्पनिक आहेत. त्यांचे सत्याशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग मानावा. या कादंबरीचा वाचनाव्यातिरिक्त इतर कोणताही वापर इतर कुठेही करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल!)  © सर्व हक्क लेखकाकडे

*** 

ही गोष्ट सुरू होते अंदाजे वीस वर्षांपूर्वी. तेव्हा नुकतीच दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात होती. मुंबई लोकल ट्रेन्समध्ये डिस्प्ले नव्हते आणि पुढील स्टेशन कोणते येणार हे लोकलमध्ये आयते सांगण्यासाठी कोणताही मंजुळ आवाज मदत करत नव्हता. टीव्ही चित्रपट क्षेत्रात विविध बदलांचे वारे वाहत होते. जागतिकीकरणामुळे भारतामध्ये अभूतपूर्व बदल होऊ लागले होते. सगळीकडे सायबर कॅफे पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्रीप्रमाणे वाढलेले होते. पाश्चात्य जीवनशैली कधी नव्हे एवढी सर्वसामान्य भारतीयांच्या समोर येऊ लागली होती. वेगाने त्याचा अंगीकार आणि अंधानुकरण होऊ लागले होते. अजून लँडलाईन फोनचे महत्व कमी झालेले नव्हते. सगळीकडे एक रुपयात बोलण्यासाठी लाल कॉइनबॉक्स फोन होते. एक पडदा आणि मल्टीप्लेक्स या दोन्ही चित्रपटगृहांची चलती होती.

सायन्स आणि टेक्नॉलॉजीने कधी नव्हे एवढी प्रगती सुरू केली होती. ती प्रगती एक्सप्रेस अशी सुसाट धावायला लागली होती की तिला कोणत्या स्टेशनवर थांबायचे हेच कदाचित समजत नव्हते म्हणून ती अविरत धावत होती. तिने विविध स्टेशनवर निसर्गाने लावलेले सावधगिरीचे लाल झेंडेपण आपल्या धावण्याच्या धुंदीत दुर्लक्षित केले. मार्गात अनेक स्टेशनवर न थांबल्याने तीने कुणाकुणाला नाराज केले आणि कुणाला नाही याची तर गणतीच नव्हती आणि तिला याची फिकीर पण नव्हती.

डिटेक्टिव्ह निगेटिव्हWhere stories live. Discover now