प्रकाशनपूर्व आलेल्या काही प्रतिक्रीया

15 0 0
                                    

सायफाय या कादंबरी प्रकारात लेखकाने कल्पनाविलास अत्यंत चांगल्या पद्धतीने केला आहे. जलजीवा आणि रंगिनी हा प्रकार तर अदभुत आहे. कादंबरीतील स्थळ आणि त्याचे वर्णन पाहता लेखकांची भटकंती आणि त्या जागेबाबतचे ज्ञान याचे दर्शन होते. सुनील, सायली, हाडवैरी, निद्राजिता या साऱ्यांची सांगड घालण्यात लेखकाला यश आले आहे. वाईट लोकांच्या विरोधात लढण्यासाठी जाताना सुनील आणि सायली यांचा विवाह मात्र प्रसंगाशी सुसंगत वाटत नाही. लेखकाने शेवटपर्यंत उत्सुकता मात्र ताणून धरली आहे. आगामी लेखनासाठी शुभेच्छा!

- विलास पंढरीनाथ बारी, शिरसोली, जळगाव-खान्देश (एम. ए. मास कम्युनिकेशन, व्यवसाय : पत्रकारिता, आवड: वाचन, भटकंती, संगीत आणि चित्रपट पाहणे)

***

मराठीमध्ये सायफाय प्रकारच्या कादंबऱ्या तश्या कमीच आढळतात. त्यात अश्या विषयाला रहस्याची डूब देऊन अखेरपर्यंत उत्सुकता ताणली आहे. विषयाचा विस्तार मोठा आणि सहसा न वाचलेला असा आहे. अश्या विषयावर एखादा चित्रपट निघू शकेल. उत्तम प्रयत्न! आणखी असे साहित्य वाचायला आवडेल.

- स्वप्निल जिरगे, कराड (मेकॅनिकल इंजिनियर, सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिटयूट. छंद: वाचन, लेखन, भटकंती, फोटोग्राफी)

***

विज्ञानातील विविध संकल्पनांचा "डिटेक्टिव्ह निगेटिव्ह" या कथेमध्ये उपयोग करून कथा अतिशय उत्कृष्टपणे गुंफली आहे. कथेची मांडणी एखाद्या रहस्यमय चित्रपटाप्रमाणे उत्कंठावर्धक आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता ताणली जाते. अनेक पात्रांची नावे आजवर कधीही न ऐकलेली अशी आहेत पण ती कथेला साजेशी आहेत.

- मंजुषा सोनार, पुणे (गृहिणी आणि ज्योतिष/अंकशास्त्र सल्लागार, छंद: वाचन, पाककला)

***

कादंबरी खूप छान वाटली. कादंबरीमध्ये असलेल्या सस्पेन्समुळे माझा कादंबरी मधील इंटरेस्ट वाढत गेला. तुमची कल्पनाशक्ती खूप ग्रेट आहे. माझी प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. हॅट्स ऑफ टू यु सर!!

- अक्षता दिवटे, बंगलोर (खासगी कंपनीत जॉब, छंद: वाचन, लेखन)

डिटेक्टिव्ह निगेटिव्हTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang