43. वादळ शांत!

53 0 0
                                    

खंडाळ्याला घाटात सिग्नल नव्हतं म्हणून एका ट्रेनला थांबावं लागलं. खिडकीतून लहान मुलांना झुडुपांवर माकडं दिसत होती. खाली खोल दरी होती. एका लहान मुलीने आपल्या हातातले केळ देण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तिच्या वडिलांनी तिला रागावून थांबवलं.

"ए हात बाहेर नको काढूस! दुरून फेक केळ त्याच्याकडे!"

"ठीक आहे पप्पा!"

तिने माकडांच्या समूहाकडे केळ फेकलं. माकडांनी ते झेलले आणि खाऊ लागले. त्या मुलीला ती गंमत आवडली. तिने स्वतःन खाता आपल्याजवळचे सगळी केळी त्यांच्याकडे फेकली.

एक केळ अचानक माकडाच्या हातातून हवेत ओढले गेले आणि दरीच्या दिशेने उडत निघाले. माकड बावचळले. दुसरे केळ पण आपोआप दरीकडे जायला लागले. माकडांची त्रेधातिरपीट उडालेली पाहून ती मुलगी टाळ्या वाजवून हसू लागली.

"पप्पा बघा ना! सगळी केळ आपोआप उडून गेली!"

पप्पा पेपर वाचत होते.

"काहीही काय? केळ कसे उडतील?"

तेवढयात त्यापैकी एक माकड हवेत आपोआप उडून खाली दरीकडे ओढले गेले.

ती मुलगी टाळ्या वाजवू लागली.

"पप्पा, पप्पा ते माकड उडायला लागलंय!"

"काहीही काय गं? माकड कशाला उडेल?"

सगळी माकडं दरीकडे आपोआप ओढली गेली. मग पप्पांच्या हातातला पेपर, जेवणाचा डबा, बॅग सगळ्या गोष्टी खिडकीतून बाहेर उडायला लागल्या. ज्या खिडकीच्या गजातून बाहेर निघू शकत नव्हत्या त्या वस्तू खिडकीला चिकटून राहिल्या आणि जणू बाहेर जायला धडपडू लागल्या. नंतर ती मुलगी उडून खिडकीला चिकटली, पप्पा, त्यांच्या मागे डब्यातील सगळे लोक, बॅग या माकड उडाले त्या दिशेला ओढल्या जाऊ लागल्या.

दरवाजा उघडा असल्याने बरेच दरवाज्यात उभे असलेले लोक प्रचंड वेगाने दरीकडे ओढले गेले. वस्तूपण दरवाज्यातून उडाल्या. काही जण हा अजब प्रकार शुटींग करून न्यूज चॅनलला पाठवू लागले, मित्रांना व्हाट्सएपवर पाठवू लागले, नातेवाईकांना फोनवरून सांगू लागले. आणि नंतर तेही शक्य झाले नाही कारण सगळे मोबाईल, वस्तू, मोबाईल धारक व्यक्ती पण ट्रेन मधून दरीकडे ओढले जाऊ लागले. सगळ्या डब्यात आरडाओरडा आणि हलकल्लोळ माजला. ट्रेनच्या चालकाला पण समजत नव्हते काय झाले ते आणि डब्यातील लोखंडी हॅंडलला घट्ट धरूनसुद्धा तोही पकड सुटून हवेत उडून दरीत ओढला गेला. मग संपूर्ण ट्रेन रुळांवरून हवेत उचलली गेली आणि दरीकडे ओढली जाऊ लागली.

डिटेक्टिव्ह निगेटिव्हWhere stories live. Discover now