हा व्हिडीओ "वाईट" ने फक्त सरकारी संस्थांना न पाठवता सरसकट सर्वच न्यूज चॅनेल्सला पाठवल्यामुळे सर्व सत्य अचानक अक्षरशः जगजाहीर झालं. काही भाग लोकांना कळला नसता तर बरं झालं असतं असं विविध गव्हर्मेंट संस्थांना वाटत असलं तरी आता काही उपयोग नव्हता. एखाद्या चॅनलने आचारसंहिता पाळून व्हिडिओ मधला काही भाग वगळायचा ठरवला तरीही इतर अनेक चॅनल्सनी संपूर्ण व्हिडिओ दाखवायला सुरुवात करून दिली होती. वाईट संस्थेलासुध्दा कदाचित हेच हवे होते. मात्र एक बरे झाले की त्यांना असे वाटत होते की अलाईड सीक्रेट फोर्सेस आता संपली.
सुपर नेचर बेटावर सर्वजण हा व्हिडिओ बघत होते. आता तातडीने ॲक्शन प्लॅन बनवायची आवश्यकता होती. हा व्हिडिओ बघून काही वेळ विचार करून डिटेक्टिव्ह निगेटिव्ह तिथे उपस्थित असलेल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना म्हणाला -
"म्हणजे त्यांना असे वाटते आहे की अलाईड सिक्रेट फॉर्सेस संस्था आता संपल्यात जमा आहे. रणजित आणि माझ्यावर हल्ला यासाठी केला असावा की मी आणि रणजित, आम्ही सोबत काम करून त्यांच्यासाठी काम करणारे अनेक अपराधी पकडले होते. मला वाटत नाही की त्यांना माझ्या सुपरपॉवरबद्दल माहिती आहे. आम्हा दोघांना त्यांना पेशी समूहात रुपांतरीत करायचे नव्हते! मारायचेच होते! नर्सने सायलीला पेशी समूहात रूपांतरित करण्याचा प्रयत्न जरूर केला कारण आपल्या प्रतिसृष्टीमध्ये एक हुशार शार्प बुद्धिमान डॉक्टर कुणाला नको असेल? तो प्रयत्न फसला. मग त्यांनी चिडून तिला मारायचे ठरवले असावे कारण ती माझ्यावर उपचार करत होती आणि अर्थात माझ्यावरही पुन्हा हल्ला केला कारण मी नरीमन पॉईंटला रणजितवर झालेल्या हल्ल्यातून वाचलो होतो. त्यांना नेत्रा यांचाही पेशीसमूह हवा होता ज्याद्वारे आपल्या संस्थेची सगळी महिती त्यांना मिळू शकली असती."
नेत्रा आणि रणजित यांचा संदर्भ आल्यावर थोड्या वेळाकरता सगळेच जण भावूक झाले. या संस्थेला इथवर आणण्यात नेत्राने जेवढी मेहनत घेतली तेवढी खचितच कुणी घेतली असेल. आज नेत्राच्या नियोजनामुळेच ते चौघे जिवंत होते आणि रणजित यांचेही अप्रत्यक्षपणे खूप योगदान होतेच!
VOCÊ ESTÁ LENDO
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Ficção Científicaहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!