35. हाडाचा लढवैय्या

24 0 0
                                    

गाडी अतिशय वेगाने चालवत ड्रायव्हरने शहरातील वेगळ्या मार्गाने हाडवैरीला आकुर्डीला आणले. मार्गात टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण त्याच्या टॅबवर हाडवैरी बघत होता. आणि सुनिलच्या दृष्टीने हाडवैरीला सांगितले की ते नुकतेच आकुर्डी स्टेशनवर पोहोचतील पण अर्थात रेल्वे तिथे थांबणार नाही पण तिथे त्या ट्रेनला तो पकडू शकतो.

दोघेजण असलेल्या डब्याचा नंबर होता: CR2 हे सुनिलने सांगितले.

आकुर्डी आलं....

ट्रेन नुकतीच आकुर्डी स्टेशनमध्ये वेगाने शिरण्याच्या बेतात होती.

एव्हाना समांतर रस्त्यावरून पोलिसांची गाडी रेल्वेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होती आणि MF1 आणि FF2 हे ट्रेनमध्ये CR7 डब्यात होते आणि त्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांच्या गाडी मागे चॅनेलवाल्यांची गाडी होती. आणखी एक दोन चॅनेलच्या गाड्या आणि पत्रकार होते.

"किशोर, कसं वाटतंय आता तिथे फिल्डवर? काय परिस्थिती आहे तिथे असं इथे बसून विचारायला छान वाटतं पण प्रत्यक्ष फिल्डवर भीतीने आपली...", अनघा उपाहासाने पुण्यातील टीव्ही स्टुडिओत बातम्या देत म्हणाली.

"अनघा, प्लिज! चांगले शब्द वापर, पुणेरी टोमणे नको. लोक ऐकताहेत आपलं बोलणं!", किशोर शरमून म्हणाला.

"अरे चांगलेच शब्द आहेत. खोट तुझ्या विचारांत आहे. मी म्हणत होते की भीतीने आपली... गाळण उडते!",अनघा डोळे मिचकावत म्हणाली.

न्यूज चॅनेलचा सिटी हेड अनघा बातम्या देत असताना तिथे आला आणि म्हणाला, "अनघा, पुरे आता. गाळण बिळण बास करा! दोघेजण भांडू नका. बातम्या द्या बातम्या. लाईव्ह दाखवा लोकांना!"

"ओके ओके!", अनघाने ओशाळून खात्री दिली.

एका न्यूज चॅनेलने चर्चा सुरू केली. जसजसे फिल्डवर त्यांचे प्रतिनिधी रिपोर्ट द्यायचे तसतसे ते बसल्या बसल्या एकमेकांच्या अंगावर ओरडून माईक, पेन कागदपत्रे एकमेकांना फेकून मारत होते. एक ग्रुप सरकारची बाजू घेत होता, दुसरा सरकारच्या विरोधात तर तिसरा कोणाचीच बाजू न घेता नुसता गोंधळ घालत होता. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेत सामील झालेल्या लोकांची पण करमणूक होत होती आणि त्यांनाही वाटत होते की आपण प्रत्यक्ष स्टुडिओत असतो तर तिथल्या बसलेल्या लोकांच्या एकेक कानाखाली आणि थोबाडीत देता आली असती...

डिटेक्टिव्ह निगेटिव्हWhere stories live. Discover now