नंतर उशिरा रात्री बराच वेळ सायली आणि सुनिल एका रूम मध्ये बोलत बसले होते. कारण या नर्सच्या घटनेनंतर चर्चा करणे आता अपरिहार्य होते. सुनिलने तीला स्वत:बद्दल सगळे सांगितले, त्याने तिला का धक्का देऊन पाडले याचे कारण सांगितले. सायलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करण्यामागे त्या नर्सचा नेमका काय हेतू होता, त्या इंजेक्शनमध्ये नेमके काय होते हेही कळू शकले नव्हते कारण ती नर्सच इंजेक्शनसहित रहस्यमयरित्या गायब झाली होती.
आता सायलीसारख्या काही दिवसांचाच परिचय असलेल्या नवख्या व्यक्तीला आणि डॉक्टरला आपल्या आयुष्याबद्दल सगळं सांगावं की नाही याबद्दल तो सुरुवातीला साशंक होता पण त्याची हॉस्पिटलमध्ये तिने मनापासून आपलेपणाने केलेली सेवा, त्याला तिच्याबद्दल वाटणारे प्रचंड आकर्षण आणि प्रेमभावना तसेच तिच्याही डोळ्यात त्याने बघितलेले त्याच्याबद्दलचे तेच भाव यामुळे त्याने सायलीला आतापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घटनांबद्दल, त्याला मिळालेल्या शक्तींबद्दल सर्वकाही थोडक्यात सांगितले. त्याने तिलाही तिच्याबद्दल विचारले की कुठेही न बघता ती कसे काय सगळे आठवून टाईप करत होती तेव्हा तिने त्याला सर्व सांगितले. तिला जन्मापासून मिळालेल्या विशिष्ट शक्तीबद्दल सांगितले.
त्याची कथा ऐकताना तिलाही अंदाज आला होताच की तिच्याप्रमाणेच तो सुद्धा मितींचे मिश्रण असलेला जीव आहे. इतरांपेक्षा वेगळा आहे. मग तिनेही तिच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना त्याला सांगितल्या. तिच्या बाहुलीबद्दल सांगितले. त्यात ती अनावश्यक घटनांचा बॅकअप बाहुलीत कशा प्रकारे घेते हेही सांगितले. जसे त्याच्याजवळ त्याच्या शक्ती संदर्भात स्फटिक आहे तसंच तिच्या जवळही बाहुली आहे. फक्त सूर्यप्रताप संदर्भात ती त्याला सांगू शकली नाही कारण तो तिच्या मेमरीतून डिलीट झालेला होता. पण आपण वेळोवेळी कोणत्या तारखेला किती वाजता बॅकअप घेतला हे मात्र तिला तपशीलवार आठवत होते.
पुढे त्यांचे बोलणे सुरूच होते!
"एक महत्वाचा विचार आला आहे सायली!"
ESTÁS LEYENDO
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Ciencia Ficciónहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!