सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथा हा साहित्यातला अत्यंत कठीण प्रकार आहे. मराठी साहित्यात तर विज्ञानकथा लेखक अगदीच मोजके आहेत. श्री जयंत नारळीकर, श्री निरंजन घाटे यांच्यासारख्या काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखकांनी विज्ञानकथा कादंब-या लिहिल्या आहेत.
विज्ञानकथा लिहिणं सोपं नाहीच. संपूर्णपणे काल्पनिक विश्व निर्माण करायचं परंतु त्या विश्वातली वास्तवाची जाणीवही हरवू द्यायची नाही हे विज्ञानकथेचं वैशिष्ठय असतं. आयझॅक असिमोव्ह, रॉबर्ट हेईनलीन आणि आर्थर सी क्लार्क हे त्या काळातले अत्यंत श्रेष्ठ असे विज्ञानकथा लेखक होते. त्यांनी निर्माण केलेल्या "रोबो सीरीज" आणि काल्पनिक ब्रहमांड या वैज्ञानिक संकल्पना इतक्या वास्तव ठरल्या की आज खरोखरीच रोबो माणसाच्या मदतीसाठी तयार आहेत. विज्ञानकथालेखकांनी पाहिलली अनेक स्वप्नं आज प्रत्यक्षात आलेली आपण अनुभवतो आहोत.
लेखकाची दृष्टी अत्यंत विशाल असते आणि विज्ञान कथालेखकाची दृष्टी तर त्याहूनही विशाल.
श्री निमिष सोनार यांनी लिहिलेली डिटेक्टिव्ह निगेटिव्ह ही कादंबरी त्यांनी मला वाचायला दिली. 255 पानांची ही दीर्घ कादंबरी खरोखरीच आगळीवेगळी आहे. सुरुवातीपासूनच पकड घेणारी आहे.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेला असामान्य सुनील कळतनकळत त्याच्यातील असामान्यत्व जाणून घेतो. वेगवेगळे अनुभव घेत मोठा होतो. आसपास असणा-या निगेटिव्हिटीची लाल वर्तुळं त्याला दिसतात आणि मग हळूहळू त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडू लागतात. वेगवेगळया मिती आणि त्या मितीच्या रंगिनीसारख्या आभासी आकृती त्याला भेटतात. सायलीसारखी विशेष शक्ती असलेली मेमरी डॉल त्याच्या आयुष्यात येते. डॉक्टर नेत्रा, हाडवैरी, निद्राजीता यासारख्या पॉझिटिव्ह शक्तींचा एक ग्रुप आणि व्हायरसिक, डिश अँटिनाडू, राऊटरन, वायरफायर यासारख्या दुष्ट शक्तींचा एक गट यांच्यातील संघर्ष निमिष सोनार यांनी उत्तम रीतीने रेखाटला आहे. विचित्र आकाराचे कृत्रिम प्राणी पक्षी, हिप्नोटाईज करणा-या बाहुल्या, या सर्वच कल्पना मुळापासून वाचण्यासारख्या आहेत.
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!