जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरले तेव्हा भारत सरकार आणि तिन्ही लष्कर यांच्या वतीने पंतप्रधानांनी देशाच्या नावे सकाळी एक संदेश जारी केला:
"भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या नव्या स्वागत संस्थेवर विश्वास ठेवा. आपण या संकटावर नक्की मात करू. कृपया एकच विनंती जनतेला आणि प्रसार माध्यमांना आहे की त्यांनी स्वागत च्या कार्यात अडथळे येतील असे काही वागू नका! आपण त्या दोघा महत्वाच्या व्यक्तींना केवळ वाचवण्यातच यशस्वी होणार नाही तर मला विश्वास आहे की आपणच जगाचे नेतृत्व करून जगावर घुटमळत असलेले हे संकट परतवून लावू! आणि जनतेला विशेषतः पुणे मुंबई जिल्ह्यातील जनतेला विनंती आहे की येणारे दोन तीन दिवस घराबाहेर पडू नका. अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा!"
आता सर्व प्रसारमाध्यमे मुंबई पुण्यातील त्या चौघा VIP च्या घराच्या जवळपास तसंच पुण्यातील संचेती हॉस्पिटलजवळ केंद्रित झाले होते. मग विविध चॅनेल्सनी वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या. सरकारवर टीका करणाऱ्या तसेच सरकारची प्रशंसा करणाऱ्या विविध हेडलाईन्स ऑनलाईन न्यूजपेपर्समध्ये यायला लागल्या.
"कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सरकार सक्षम!"
"आता सरकार सुपरहिरोसारख्या दिसणाऱ्या लोकांवर अवलंबून राहणार काय?"
"तिन्ही लष्कर कमी पडतात की काय, जेणेकरून सरकारला अशा एका संस्थेवर अवलंबून राहते आहे?"
"आता सरकार लष्कराची कामे पण आऊटसोर्स करायला लागलं आहे"
"आजच्या या युगात माणसे आधीच हिंसक झालीत, पैशांसाठी खून करत आहेत आणि आता तर प्राणी सुद्धा त्यात सामील झालीत, जगाचा अंत जवळ आला आहे का? माणसाने विज्ञानाचा वापर चांगल्या पेक्षा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी केल्याने ही आज जगावर पाळी आली आहे!"
जगभरातील विविध देशांतील प्रसार माध्यमे पण या घटनेकडे लक्ष ठेऊन होती. भारतातून त्यांना वेळोवेळी अपडेट देण्यात येत होते. अनेक देशातील विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा वार्तांकन करत होते.
YOU ARE READING
डिटेक्टिव्ह निगेटिव्ह
Science Fictionहा डिटेक्टिव्ह वेगळा आहे आणि त्याचे "स्वागत" पण वेगळ्या प्रकारे होणार!