नऊ

502 2 0
                                    


तुझ्या पाठीवर डाव्या बाजूला रक्त साकळलेला डाग मला कहाणी सांगत होता.

आदल्या दिवशीच्या तुझ्या व्यभिचाराची आणि माझ्या बाबतीत मागे पडलेल्या आकर्षणाची.

तुझ्या चोरट्या नजरेतला भाव मला कहाणी सांगत होता.

तुझ्या मनातल्या काळोखात दडलेल्या असंख्य कृष्णकृत्यांची.



तुला वाटते, त्या गोष्टी मला कळल्यावर त्या माझ्यासाठी त्याज्य असणार.

तुला वाटते सभ्यतेच्या माप दंडावर मी त्या तोलत बसणार.

पण सखे, तुला नाही माहित. तुझ्या चेहऱ्यावर असणारी समाधानाची रेषा मला आवडते.

सुखाच्या असंख्य लहरींवर तू स्वार आहेस हेच चित्र मला भावते.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now