एकोणीस

302 5 0
                                    

तुझ्या विचारांमध्ये आणि माझ्या विचारांमध्ये फारशी तफावत नसते.

पण तरीही हल्ली तुझे मन माझ्यासमोर सर्वांगाने प्रकट होत नाही.

आपण इतक्या वर्षांचे सोबती आहोत आणि नक्कीच पुढेही कित्येक वर्षे राहणार आहोत.

पण तुझ्या तनामनाची मागणी तू माझ्यासमोर आणत नाही.



मी तुझ्या अंतरंगाचा काळोख सहन करणार नाही असे तुला वाटते का?

मी तुझ्या प्रतारणांचा हिशोब तुला मागेन असे तुला वाटते का?

तुझे शारीरिक समाधान तू कसेही मिळव मला काही म्हणायचे नाही.

पण कधीच तुझ्या मनगर्भाचा आसमंत माझ्यासाठी परका करायचा नाही.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now