चौदा

355 4 0
                                    

त्या दिवशी ते निखारे तुला पाहून भडकले होते,

मी विचार केला इंधन माझ्याकडे आहे भडकू देत काय भडकायचे ते.

त्या दिवशी तुझ्या सौंदर्य ज्योतीला पाहून ते पतंग जलनोत्सुक झाले होते

मी विचार केला ज्योत तर माझी आहे दाहही माझाच आहे.



पण मी पहिले त्या निखार्यांना भडाग्नी बनून तुझ्या सोबत जळताना.

मी पाहिले तुझ्या सौंदर्य ज्योतीमध्ये झळाळून पतंग जळताना.

त्या दिवशी मला उमजले माझ्या वाट्याचे मला केव्हाच मिळून संपले होते.

आता मी तुला अडवू शकत नाही तुझ्या वाट्याचे मिळवताना.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now