सत्तावीस

376 3 0
                                    


तू का विचार करतेस ?

कि मला दुखेल.

तू का स्वतःला बजावतेस ?

तुझी प्रतारणा मला खुपेल.



ह्या वाटेवर तू जावंस

हि माझीच तर कल्पना होती.

तुझ्या स्त्रीत्वाचा कस तू तपासावा.

हि माझी तर सूचना होती.



तर आता मागे फिरू नकोस.

हाताशी आलेले सुख डावलू नकोस.

तो तुला सुखाच्या शिखरावर पोहोचवेल.

फक्त खाली वळून माझ्याकडे पाहू नकोस ... माझ्याकडे पाहू नकोस.



- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now