तुझ्या स्त्रीत्वाचा दाह देऊन
समोरचे पौरुष वितळवणे हा तुझा आवडता खेळ.
अन त्याच लाव्ह्यामध्ये पोळून होरपळून तयार झालेले
माझे पौरुष म्हणजे तुझ्यासाठी खास मेळ.
तुझ्या यौवनाचे आव्हान पेलायला
कितीतरी जण आहेत तयार.
बालिश आहेत ते वाकतात तुझ्या लावण्यासमोर, पण तू जाणतेस.
माझ्यासमोर बोथट आहे तुझ्या स्त्रीत्वाची धार.
-शब्दभ्रमर
YOU ARE READING
तुला काही सांगू ईच्छितो ...
Fantasyमाझ्या प्रियेला मला जे सांगायचे आहे ते इथे मी उलगडले आहे. मला माहिते मी हे तिला कधीच सांगू शकणार नाही. पण मी स्वतःला व्यक्त होण्यापासून अडवू शकत नाही.