ज्या दिवशी तू पहिल्यांदा स्लिव्हलेस ब्लाउज घालून ऑफिसला गेली होतीस
त्याच दिवशी मी ओळखले होते, कारण पाठीवरचे हुक घरातून जाताना वरखाली नव्हते.
ज्या रात्री तू म्हणाली होतीस हल्ली शृंगार नको झालाय.
त्याच रात्री मी ओळखले होते, कारण मी झोपलेला पाहून तू चादर सरकवत सेल्फी काढली होतीस.
ज्या दिवशी तू माझ्यासाठी टी शर्ट आणि स्वतःसाठी सोन्याचे ब्रेसलेट आणले होतेस.
त्याच दिवशी मी ओळखले होते, कारण तुझ्या पर्समध्ये फक्त टीशर्टची पावती होती.
तुझ्या शरीराची गरज वाढली आहे हे मला समजत आहे
पण मग सरळपणे तू मला हे सांगायला माझी कुठे काय हरकत होती.
-शब्दभ्रमर
KAMU SEDANG MEMBACA
तुला काही सांगू ईच्छितो ...
Fantasiमाझ्या प्रियेला मला जे सांगायचे आहे ते इथे मी उलगडले आहे. मला माहिते मी हे तिला कधीच सांगू शकणार नाही. पण मी स्वतःला व्यक्त होण्यापासून अडवू शकत नाही.