पंचवीस

279 4 0
                                    


त्या रात्रीचा प्रणय तुला

प्रतारणेची जाणीव तर करून देत नाहीना?

माझ्या व्यतिरिक्त तुझ्या ओठांचा मधू कोणी घेतला म्हणून

तू अस्वस्थ तर होत नाहीस ना?



भयानक कामवादळ सहन करत

स्वतःला त्यात झोकून देताना.

मी त्या वादळामुळे भरकटत जाईन

अशी भीती तुला सतावत तर नाहीना?



तुला आश्वस्थ करण्यासाठी माझी

उबदार कव तुला चालेल का?

कि तुझ्या मनाच्या शांतीसाठी

मी तुझ्या प्रणयाराधनेच्या जागी असावे असे तर तुला वाटत नाही ना?



-शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Where stories live. Discover now