तुझ्यातले स्त्रीत्व प्रसन्न आणि टवटवीत राहावे म्हणून
मी सदैव त्याच्या इच्छांचा आदरच करत आलो आहे.
तुझ्या जाणिवांचा रम्य गुच्छ सदा बहरलेला राहावा म्हणून
मी सदैव त्याची मशागत करत आलो आहे.
पण तुझ्या यौवन पुष्पाचा मकरंद कोणी शोषून घ्यावा,
अशी भावना माझ्या मनी कधी दाटली नव्हती.
तू तुझ्या सुगंधाने जवळ खेचल्या भृंगाची भीती
मला कधीच वाटली नव्हती.
-शब्दभ्रमर
YOU ARE READING
तुला काही सांगू ईच्छितो ...
Fantasyमाझ्या प्रियेला मला जे सांगायचे आहे ते इथे मी उलगडले आहे. मला माहिते मी हे तिला कधीच सांगू शकणार नाही. पण मी स्वतःला व्यक्त होण्यापासून अडवू शकत नाही.