तीन

1.9K 4 0
                                    

तुझी अदा किती जालीम आहे हे इतक्या वर्षांनी कदाचित मी सांगू शकणार नाही.

पण म्हणून तुला नव्या दिवाण्याची गरज वाटत आहे का?

तुझ्या सौंदर्याला अगदी पहिल्या सारखीच चवीने दाद आता मला देता येणार नाही.

पण म्हणून तुला नव्या रसिकाची गरज वाटत आहे का?



विश्वास ठेव तुला तसे दिवाणे मिळतीलही

तुझ्या सौंदर्यापुष्पाचा लोभ लागलेले भुंगे तुझ्या भोवती फिरतीलही.

पण आपला झाला तसा पहिल्या प्रेमाचा अविष्कार त्यांच्या मनात तू कुठून करशील?

माझ्यासोबतच्या पहिल्या प्रणयगंधाचा सुवास कसा मिटवशील? 


- शब्दभ्रमर

तुला काही सांगू ईच्छितो ...Hikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin