आताशा तू मला तुझ्या ऑफिसातल्या सहकार्यांच्या कार्यक्रमांना नेत नाहीस..
आताशा तू मला कुठेही जायच्या आधी फारसे काही सांगत नाहीस..
मी कॉल केल्यावर बरयाचदा मागे कसलीच गाज नसते..
असले कसले कार्यक्रम असतात ज्यांना माणसे नाही शांतता उपस्थित असते..
मान्य आहे आता माझे थोडे वय होत चालले आहे आणि ..
तुझ्या रूपाची धार बोथट झाली नाहीये..
पण तुझ्या रूपाच्या टवटवीसाठी
माझ्या आयुष्याच्या मातीशिवाय पर्याय नाहीये.. पर्याय नाहीये...
- शब्दभ्रमर

أنت تقرأ
तुला काही सांगू ईच्छितो ...
خيال (فانتازيا)माझ्या प्रियेला मला जे सांगायचे आहे ते इथे मी उलगडले आहे. मला माहिते मी हे तिला कधीच सांगू शकणार नाही. पण मी स्वतःला व्यक्त होण्यापासून अडवू शकत नाही.