मी आणि राहुल हॉस्पिटलला पोहोचलो..
राहुलने सांगितले की समीरचे ऑपरेशन जवळजवळ सहा तास चालले होते..
आता तो आऊट ऑफ डेंजर असला तरी त्याची नेमकी स्थिती तो पूर्णतः शुद्धीत आल्याशिवाय समजणार नव्हती..
आम्ही आलो तेव्हा समीरचा भाऊ पोलिस स्टेशनला आणि घरी पण जाऊन येतो असे म्हणाला आणि निघून गेला..
राहूलने डॉक्टरांना रिक्वेस्ट केली म्हणून मला आय सी यू मध्ये जाऊन समीरला बघण्याची परवानगी मिळाली..समीर..
माझा जिवलगा..सलाईन आणि वेगवेगळ्या नळ्यान्मध्ये जखडून शांत झोपला होता..
मी त्याच्या कपाळाला चुंबन दिले..
त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला..
आणि मला खूप गहिवरून आले..
त्याची अवस्था माझ्याकडून पाहवलीच गेली नाही..
मी कसेतरी माझ्या डोळ्यातल्या आसवांना थोपवून तिथून बाहेर आले..राहूल बाहेरच उभा होता..
वेटींग एरिया मधल्या बाकावर बसून मी माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली..
राहुल माझ्यापाशी येऊन बसताच मला भावना अधिकच अनावर झाल्या..
मी त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन रडत होते..
यावेळी तो ऑकवर्ड वाटला नाही..
त्याने जरा वेळ मला रडू दिले..
नंतर माझ्या हातावर हात ठेवत तो म्हणाला..
"खूप क्लोज आहात ना तुम्ही समीरशी"
आणि त्याने त्याचा रुमाल पुढे केला..मला माझ्या भावनांना आवर घालावा लागला..
माझे असे वागणे निश्चितपणे समोरच्याच्या मनात संशय निर्माण करणारेच होते..मी त्याच्याच रुमालाने माझे डोळे पुसले..
जरा वेळ आम्ही तिथेच बसलो..
मग राहुलने पुन्हा मौन सोडले..या हॉस्पिटलचे कॅन्टीन चांगले आहे..
तिथे कॉफी घेता घेता बोलूया का आपण?..
मग मी तुम्हाला घरी सोडतो..मी मान डोलावून शांतपणे त्याच्यामागे गेले..
राहुलच्या चालण्यात वेगळाच रुबाब होता.
हॉस्पिटलमधल्या तरुण नर्स आणि लेडी डॉक्टर्स पण राहुलकडे डोळे फाडून बघत होत्या..
माझ्याकडे बघून जेलस फील करत होत्या..कॉफी पिताना सगळी हकीकत राहुलने मला सविस्तरपणे सांगितली..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...