घरी पोहोचताच समीरने मला मेसेज केला..
स्विटू, मला खूप झोप येतेय, आज मी कॉलेज बंक करतोय..
उठलो की कॉल करेन तुला..
गुड नाईट..माझीही तिच कंडीशन होती पण मला सुट्टी घेता येणे शक्य नव्हते..
मी ठरवले की आज माझ्या स्टुडंट्सला सरप्राईज टेस्ट देऊन टाकेन.. म्
हणजे निदान तोंडाला तरी आराम मिळेल..
चिरागने आज सर्व स्वतःचे स्वतः आवरले..
त्याला वाटले की बाबा ऑफिस टूरला गेला की मम्मा त्याला खूप मिस करते आणि म्हणूनच तिला काल बरे नव्हते..
सकाळी हेमंतचा व्हिडिओ कॉल आला..
जरा वेळाने त्याची मीटिंग होती..
चिरागने हेमूला सांगून टाकले की, काल मम्माला बरे नव्हते..
माझा चेहरा पाहून हेमू चिडला, जयू काल तू झोपली आहेस की नाही?
किती थकल्यासारखी वाटतेय तू..
स्टॉप बिहेविंग लाईक अ न्यूली मॅरीड लेडी..
मी कायमचा नाही गेलोय..
हेमूच्या त्या बडबडीकडे माझे मुळीच लक्ष नव्हते..
त्याची मीटिंगची वेळ झाली असे मी त्याला रीमाईंड करून देताच तो बाय करून निघून गेला..दरम्यान माझ्या एकेक बॅचेस सुरू होत्या..
मी आज फक्त जांभया देत होते..
कुंदाने आज तीनदा चहा बनवून दिला पण माझी झोप काही उडत नव्हती..मी सकाळीच सर्व किचन नीट करून ठेवले होते.. त्यामुळे काल रात्री किचन प्लॅटफॉर्मवर काय घडले असेल याची पुसटशी कल्पना पण कुंदाला आली नसणार..
मला आठवले की, कुंदाच्या नवऱ्याला एक गर्लफ्रेंड होती..
कुंदा चिडून त्या "बाईला" कायम सटवी किंवा गावभवानी म्हणायची कारण कुंदाचा नवरा अनेकदा रात्री त्या बाईसोबतच असायचा..
कुंदाबद्दल मला कायम खूप वाईट वाटायचे..
मी खूपदा तिला समजावले होते की त्या नवऱ्याला सोड..
तू आत्मनिर्भर आहेस..
स्वतः कमावून खातेस..
तुला त्याचा त्रास सहन करायची काय गरज?..
पण कुंदाचे खूपच आंधळे प्रेम होते तिच्या नवऱ्यावर.. आणि दृढ विश्वास होता की एक दिवस ती भवानी तिच्या नवऱ्याचा विश्वासघात करेल आणि त्याला अक्कल येईल..
या वेड्या आशेवर ती जगत होती..
तिच्याकडे बघून मला कायम वाटायचे की सगळ्या नवऱ्यांची जात एकसारखीच असते..
त्यांना आपल्या बायकांची जराही कदर नसते..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...