स्वतःचे लक्ष विचलित व्हावे म्हणून मी बाहेर पार्किंग मध्ये येऊन उभी राहिले..
आणि माझे लेकरू सायकल नीट चालवते की नाही याचे निरीक्षण करू लागले..
त्याला जेवणासाठी पण बोलवायचे होते..
पण बाळाचा जेवायचा बिलकुल मूड नव्हता..
सायकलचे मोठमोठे राऊंड्स मारत तो मला कौतुकाने दाखवत होता..माझ्या लेकराकडे मी अभिमानाने पाहत असताना मनात पुन्हा खूप वाईट विचार येऊ लागले..
मी उत्साहाच्या भरात समीरला माझा फोटो तर शेअर केला..
पण त्याने त्या फोटोचा मिसयुज केला तर?..
कुठे शेअर केला तर?..
किंवा कोणी पहिला तर?..
मला खूप भीती वाटत होती..
मी अस्वस्थ होऊन पुन्हा घरात आले..
आणि..
समीरला फोन लावला..माझे नशीब चांगले की तो बाथरुम मध्ये नव्हता आणि त्याने लगेच फोन उचलला..
समीरने काही बोलायच्या आधीच माझी बडबड सुरू झाली..
सम्या त्या मघाच्या फोटोचे काय केलेस तू?..
समीरला काहीच समजेना की मला नक्की काय म्हणायचेय..
तो दबक्या आवाजात म्हणाला..
एक मिनिट थांब..
इथे माझे पॅरेंट्स आहेत..
त्याने माझा कॉल कट केला..
काही मिनिटात पुन्हा त्याचाच कॉल आला..
अगं राणी..
तुझा फोटो बघत तुला इमॅजिन करत शांत केले मी स्वतःला..
घरातून बाहेर येऊन त्याने उत्तर दिले..
तरीही मी त्याला परत तोच प्रश्न विचारला..
आणि त्या फोटोचे नंतर काय केलेस?
मग मात्र समीर चिडला..
तुझा विश्वास नाही का माझ्यावर?..
तसे असेल तर यापुढे एकही पिक शेअर करू नकोस.. अगं, माझे काम झाले आणि मी तो फोटो लगेच डिलीट केला..
अगदी रिसायकल बिन मधून सुद्धा..
कारण मला तुझी काळजी आहे राणी..
मला कोणतीच चूक करून तुला गमवायचे नाही..
आणि तुला जर वाटत असेल की, तुझे फोटोज् जमा करून मी तुला ब्लॅकमेल वगैरे करेन तर हा निव्वळ तुझा भ्रम आहे जयू..
मला फक्त तू हवी आहेस..
तुझे प्रेम हवे आहे..
समीर खूप मनापासून बोलत होता..
साहजिकच माझा त्याच्यावर विश्वास बसला..मी समीरला सॉरी म्हणेपर्यंत गेटचा आवाज आला..
मी घाईत त्याला बाय करून फोन कट केला..
सर्व चॅटस् आणि कॉल हिस्टरी डिलीट झाल्याची शहानिशा केली..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...