समीर आणि मी कितीतरी वेळ तसेच कडल करून होतो..
अधून मधून तो माझ्या केसातून हात फिरवत होता तर कधी कपाळाला किस करत होता..
असे वाटत होते की हे सर्व कधी संपूच नये आणि त्याने मला सोडून कधीच जाऊ नये पण दोघांच्याही खूप साऱ्या वैयक्तिक जबाबदाऱ्या होत्या..
माझ्यातली आई हळूहळू जागी झाली आणि मी सम्याला अलर्ट केले..
त्याला मी म्हणाले..
समू, चल आवर..
तुला जावं लागेल आता..
चिराग येईलच स्कूलमधून..
त्याला उगाच वेगळं काही वाटायला नको रे..
सम्या मात्र ऐकून न ऐकल्यासारखा माझ्या केसांशी खेळण्यात मग्न होता..
मी शेवटी त्याची मिठी सोडवून घेतली आणि उठून बसले..
त्याने पुन्हा मला बॅक हग केले..
त्याची काही जायची इच्छा नव्हती..
पण मी बळेच त्याला लवकर आवरण्याची घाई केली.. इकडेतिकडे विखुरलेल्या त्याच्या वस्तू गोळा करत समोर आरशात बघत सम्या स्वतःचा अवतार नीट करत होता..
आणि मी त्याचे रुपडे मनसोक्त न्याहाळत होते..
साक्षात कामदेव भासत होता तो मला..
त्याचे माझ्याकडे लक्ष गेले आणि आरशात बघतच मला त्याने डोळा मारला..
मी पुन्हा लाजले..
मग त्याने मला आठवण करून दिली..
तुला नाही का आवरायचे? की तू अशीच जाणार चिरागला घ्यायला?..
असे म्हणत तो मोठ्ठ्याने हसला..
त्याने असे म्हणताच मग मी पण गडबडीत उठले..
मला त्याच्यासमोर उठण्याची का कोणास ठाऊक खूप लाज वाटत होती..
आणि तो मात्र आता मी वॉशरूम पर्यंत कशी जाणार याची जणू गंमत बघण्यासाठी आतुर होता..
मी त्याला म्हणाले तू हॉलमध्ये जा आधी..
मग मी होते तयार..
पण त्याने काही ऐकले नाही..
शेवटी मी नाईलाजाने लाजत, ओशाळत कशीबशी उठले..
एक गाऊन अंगावर चढवला..
आणि दहा मिनिटात सर्व बेडरूम असे आवरले की जणू इथे काही घडलेच नाही..
सम्यानेही बेडरूम नीटनेटके करायला मदत केली..
बेडवरची चादर नुकत्याच घडून गेलेल्या अद्भूत क्षणांची साक्ष देत होती म्हणून ती चादर पण बदलून टाकली..
समीर तिथेच बेडवर बसून त्याचा फोन बघण्यात व्यस्त होता..मी जेव्हा आरशात माझे केस बांधू लागले तेव्हा सम्या पाठीमागे येऊन उभा राहिला..
माझ्या खांद्यावर त्याची हनुवटी टेकवत म्हणाला..
किती शोभतो बघ आपण एकमेकांना..
असे बोलत बोलतच परत कमरेला मिठी मारली..
तुझी हरकत नसेल तर मला तुझ्याशी लग्नही करायला आवडेल..
त्याचे ते वाक्य ऐकून काळजात एकदम धस्स झाले.. अरे, तू वेडा आहेस का? मी थोडेसे चिडक्या स्वरात म्हणाले..
तर म्हणतो कसा..
हो,आहेना मी वेडा.. तू लावलेस मला वेड..
आणि '
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...