हेमंत बोलल्याप्रमाणे बरोबर रात्री दहापर्यंत घरात होता..
तो थकला असणार म्हणून मी त्याच्याशी फार बोलायचे टाळले..
त्याने शॉवर घेतले आणि त्याचा नाईटसूट घालून तो बाहेर सोफ्यावर जाऊन बसला..मी गेल्या दोन दिवसात खूप थकले होते..
मला झोपेची नितांत गरज होती..
म्हणून मी त्यालाही बेडरूममध्ये बोलावले..
तर मला म्हणाला की तूच जरावेळ इथे थांब..
आय नीड टू टॉक टू यू..
आपल्या बडबडीने चिरागला जाग नको यायला..हेमंत गंभीर चेहऱ्याने बोलत होता..
माझे हार्ट आता बुलेट ट्रेनच्या स्पीडने धडधडत होते..
पुढे तो काय बोलणार याची नुसती कल्पना करून मला दरदरून घाम फुटला होता..
चिरागने चुकून माझी पोलखोल तर केली नसेल ना..
आता माझे काही खरे दिसत नाही या भीतीने माझी गाळण उडाली होती..हेमंतने डोळ्यांनीच इशारा करत मला जवळ बसायला सांगितले..
कारण तो फोनवर मेल चेक करण्यात बिझी होता..
त्याने फोन बाजूला ठेऊन माझ्याकडे बघितले..
मी त्याच्या नजरेला नजरच मिळवू शकत नव्हते..
मी मान खाली घातली..
त्याने माझ्या हनुवटीला पकडून माझा झुकलेला चेहरा वर केला आणि..
आणि जवळ येत कपाळावर किस केले..
मला आता रडूच कोसळणार होते..
पण मी माझ्या भावनांना आवर घातला..त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला..
विजया, तू उद्या संपूर्ण दिवस चिराग आणि क्लासेस यांमध्ये बिझी असशील म्हणून मला तुझ्याशी आज हे सर्व बोलणे नितांत गरजेचे आहे..
मला एक खूप महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे..
त्यात तुझे मत जाणून घेणे खूप आवश्यक आहे..
कारण तो फक्त माझा नाही तर आपल्या संपूर्ण फॅमिलीसाठीचा निर्णय असणार आहे..हेमंतने असे बोलताच माझा सर्व खेळ संपला आणि माझे सर्व आयुष्य मातीमोल झाले असे मला वाटू लागले..
मी कसेबसे आवंढे गिळत त्याचे बोलणे ऐकत होते..
मला खात्री होती की, चिरागने नसेल पण समीरने नक्कीच हेमंतला कॉन्टॅक्ट केला असणार..
आणि आता क्राईम स्टोरीमध्ये दाखवतात तसे तो हेमंतला माझ्या अगेन्स्ट काहीतरी प्रुफ दाखवून ब्लॅकमेल करण्याच्या तयारीत असणार..
आणि म्हणूनच हेमंतने आपल्याला सोडण्याचा निर्णय घेतला असणार..
इतके टोकाचे विचार माझ्या मनात येत होते..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...