मला एकीकडे हेमंतची कीव येत होती तर दुसरीकडे समीरचा खूप राग येत होता..
कारण इथून गेल्यापासून त्याचा कॉल किंवा एकही मेसेज आला नव्हता..
मी पण मुद्दामच एकपण टेक्स्ट केले नाही..
सायंकाळची माझी बॅच सुरू झाली आणि तितक्यात त्याचा मला कॉल आला..
जयू, आय नीड इमिजियट हेल्प..
अगं काय झालं ना..
या शलाकाने ऐनवेळी प्लॅन चेंज केला आणि सीसीडी ऐवजी मला स्टारबक्सला घेऊन आली आहे आणि अफाट बिल झालंय गं..
इतके पैसेच नाहीयेत माझ्याजवळ..
तू प्लीज गूगल-पे कर ना..
मी उद्या परत देईन तुला..
लवकर कर हां प्लीज..
शलाका माझा वेट करतेय बाहेर..मला सम्याची चांगलीच जिरवायची होती..
तो स्वत:पण गूगल-पे करू शकला असता ना?..
मला का सांगत होता?..
पण मला अचानक आठवले की काल रात्री पण त्याने सर्व खर्च त्याच्या पॉकेटमधून केला होता..
म्हणून मी त्याने सांगितलेली अमाऊंट "त्या" नंबरवर काहीही न बोलता जमा केली..
सम्याने मला खूप वेळा थँक्यू म्हटले..
"नो फॉरमॅलिटीज प्लीज" असं बोलून मी फोन ठेवला..माझे रात्रीचे सर्व काम आटोपले, हेमंतचा कॉल पण येऊन गेला होता..
मी बेडवर आडवी झाले आणि फोन हातात घेताच समीरचे टेक्स्ट पाहिले..
तुझे मिस्टर कधी येणार आहेत असे त्याने विचारले होते..
मी त्याला "उद्या रात्री" असे उत्तर दिले..
आणि इंस्टाग्रामचे काय नोटीफीकेशन आले ते पाहू लागले..मला ऋषिकेश पंडितची रिक्वेस्ट आली होती..
त्याला बघताच मला खूप आनंद झाला कारण शाळेत असताना तो माझा जिगरी दोस्त होता..
कॉलनीमध्येही शेजारी-शेजारी असल्याने प्रत्येक क्षणी तो माझ्या सोबत असायचा..
आम्ही जेव्हा सातवीत होतो आणि तेव्हाच वर्गात तास सुरू असताना माझे पिरीयेड्स पहिल्यांदा आले तेव्हा मधल्या सुट्टीत आधी टीचरला नाही तर मी त्याला सांगितले होते..
तो मला त्याच्या सायकलवर डबल सीट घरी घेऊन आला होता..
नंतर माझी सायकल पण त्यानेच घरी आणून ठेवली.. माझी पहिलीच वेळ असल्याने मी खूप डिस्टर्ब होते तेव्हा त्याने माझी खूप काळजी घेतली होती..
माझा सर्व होमवर्क त्यानेच केला होता..
मला खूप चॉकलेट्स आणून दिले होते स्वतःचा पॉकेटमनी खर्च करून..
थोडक्यात ऋषी जणू काही माझा बालपणीचा केअरटेकर होता..
त्याची रिक्वेस्ट बघून मला आकाश ठेंगणे झाले..
कारण त्याच्या बाबांची बदली झाली आणि ते सर्व कुटुंब तडकाफडकी मुंबईला निघून गेले..
तेव्हा मी नेमके इंदोरला मामाकडे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गेले होते..
घरी परतल्यानंतर जेव्हा मला समजले की ऋषी मला न भेटताच कायमचा निघून गेला तेव्हा मी खूप रडले होते..
आठ-दहा दिवस नीट जेवले पण नव्हते..
शेवटी माझ्या बाबांनी मला प्रॉमिस केले की ते ऋषीच्या बाबांचा फोन नंबर आणतील आणि मग मी ऋषी सोबत बोलू शकेन..
कारण मला त्याच्याशी खूप भांडायचे होते मला सोडून गेला म्हणून..
पण माझ्या बाबांनी "ते प्रॉमिस" कधीच पूर्ण केले नाही..
म्हणतात ना की, प्रॉमिस हे तोडण्यासाठीच केले जातात..
आज तोच ऋषी माझ्यासमोर साक्षात दिसत होता..त्याचे अकाउंट ओपन होते..
त्याच्या पोस्ट्सवरून समजत होते की त्याचे नुकतेच लग्न झालेले असावे..
खूप सुंदर होती त्याची वाइफ..
मी त्याला "हाय" असे टेक्स्ट केले आणि त्याची रिक्वेस्ट घेतली..
त्यालाही पाठवली..
समीरने इंस्टाग्राम कसे वापरायचे याचे अगदी छान ट्रेनिंग मला दिले होते..
मला दोनच मिनिटात ऋषीचा रिप्लाय आला..
विजया..
ओह माय स्वीट लिटिल फ्रेंड..
आय एम वेरी सॉरी..
आय नो, तू माझ्यावर खूप नाराज असणार..
बट ट्रस्ट मी..
की, मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला कायमच.. पण मला तुझा काहीच थांगपत्ता लागला नाही..
त्याच्या त्या सॉरीने माझा राग कधीच मावळला होता.. मग नंतर आम्ही थोडेफार प्रोफेशन विषयी आणि काही फॅमिलीबद्दल गप्पा मारल्या..
ऋषी मर्चंट नेव्ही मध्ये डॉक्टर होता असे तेव्हाच समजले..
तो एक महिना क्रुझवर आणि एक महिना घरी असायचा..
चॅटिंग करताना हे पण समजले की तो देखील पुण्यातच सेटल्ड आहे..
मला त्याला भेटण्याची खूपच उत्कंठा होती..मी ऋषी सोबत बोलत असतानाच समीरचा कॉल आला..
नशीब चिराग तोवर गाढ झोपी गेलेला होता..
जानू, तुला झोप नसेल येत तर येऊ का मी झोपवायला?..
असे समीरने मला विचारले पण चक्क आत्ता माझी समीरला भेटण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण मी आधीच खूप थकले होते..
त्याची शलाकासोबतची डेट कशी झाली? अशा फॉर्मल गप्पा मी त्याच्याशी केल्या आणि त्याला सांगितले की मला खूप झोप येतेय..
तर चिडून मला म्हणाला, पण त्या ऋषीसोबत तर तू खूप उत्साहाने गप्पा मारत आहेस आत्ता..
त्याला स्वतःचा नंबर पण शेअर केलास काही मिनिटं आधी..
व्हॉट द फ*.. याला कुठून समजले हे सर्व..
मी बुचकळ्यात पडले..
तर स्वतःच माझी शंका दूर करत म्हणाला की तुझ्या इन्स्टा अकाउंटचा ॲक्सेस माझ्याकडे पण आहे..
तू जे जे करशील ते सर्व मला समजेल..
ते ऐकून माझ्या डोक्यातच सणक गेली..
पण मी काहीच रिॲक्ट न करता त्याला सांगितले की मला खरंच खूप झोप येतेय..
आणि मी त्याला गुड नाईट करून ऑफलाईन निघून गेले..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...