सकाळी अलार्म आणि हेमंतचा फोन एकाच वेळी रिंग झाले..
अलार्म बंद करत मी फोन घेतला..
लगेच हेमंतची कॅसेट सुरु झाली..
आय नो जया.. तू चिडली ना माझ्यावर?..
आय एम सो सॉरी डियर..
अगं काय झाले माहितेय का?..
हॉटेलच्या डिनर काऊंटरला जुन्या कंपनीमधला एक मित्र भेटला..
खूप गप्पा रंगल्या मग आमच्या..
जेवण झाल्यावरही आम्ही हॉटेलच्या लॉबीमध्ये गप्पा मारत बसलो..
मी त्या नादात चक्क विसरलोच की तुला कॉल करायचा होता..
तुला रात्री झोप लागली का व्यवस्थित?
चिराग त्रास नाही ना देतेय तुला?
वगैरे.. वगैरे.. वगैरे..
हेमंत बोलतच होता..
मी केवळ ओके, हो, नाही अशी त्रोटक उत्तरे त्याला देत होते..
चल मग आवरतो आता मी.. तूही आवर.. नाहीतर तुला पण लेट होईल..
चिरागला सांग बाबा आठवण काढत होता..
बाय डियर..
हेमंत एकटाच अशी सर्व बडबड करून निघून पण गेला..आमचे बोलणे असे एकतर्फीच असायचे..
हेमंतच जास्त बोलायचा आणि मी केवळ ऐकायचे..
हेमंतचा कॉल ठेवला आणि ऋषीचा मेसेज पाहिला..
ऋषी आज पुण्यात येत होता..
खूप वर्षानंतर त्याला भेटण्याची आणि त्याच्याशी भांडण्याची माझी इच्छा आता लवकरच पूर्ण होणार होती..
माझ्याकडे जास्त वेळ नसल्याने मी त्याला एक फॉर्मल रिप्लाय पाठवून दिला..
आज चक्क व्हॉट्सॲपवर समीरने हजेरी लावलेली नव्हती..
काल खूप उशिरापर्यंत ग्रुपस्टडी करून साहेब आता झोपले असतील असा तर्क मी लावला..
आणि माझ्या दिनचर्येला सुरुवात केली..
चिरागने आज काहीच त्रास न देता सर्व उत्साहाने आवरले..
आवरता आवरता "समीर येणार आहे ना मम्मा आज?".. असेही मला विचारले..
मी चिरागला ओरडले "अरे, त्याला समीर दादा म्हण, खूप मोठ्ठाय तो तुझ्याहून"..
आणि तूच विचार त्याला कॉल करून की तो येणार की नाही"
चिराग कपाळावर हात मारत म्हणाला,"अगं, तोच म्हणाला मला की, आपण दोघे बेस्ट फ्रेन्ड आहोत ना?.. सो डोन्ट कॉल मी दादा बिदा"..
चिरागने समीरला खरंच फोन लावला आणि दोघांमध्ये काहीतरी संवाद झाला..
मी ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीतरी खुसूर् फुसुर सुरू होती त्यामुळे मला समजलेच नाही..
BINABASA MO ANG
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...