समीर:
आता मी आलोय ना..
तुला पुन्हा कधीच सोडून जाणार नाहीये मी..
गेल्या काही महिन्यात पूर्ण जीवनानुभव घेतलाय मी..
कोण आपले आणि कोण परके याची समज आली आहे मला..
हा समीर आता खऱ्या अर्थाने मोठा झालाय जयू..समीर खूप मनापासून बोलत होता..
विजयाला त्याचा हिरमोड करायचा नव्हता..
म्हणून काही गोष्टी मनातच ठेवत तिने त्याच्या नाकावर नाक घासत त्याला ' बरं ' असे म्हटले..
आणि फुलांच्या माळा हातात घेऊन पारावरून उठली..
तिने समीरला डोळ्यांनीच चलण्याचा इशारा केला..
तो लगबगीने तिच्या मागे येत होता..
चालता चालताच ती त्याला सांगत होती की..समू..
मी इथे कशी आले हा प्रश्र्न साहजिकच तुझ्या मनात आला असेल नाही?..
माझ्या आयुष्यात जे प्रसंग आले त्यांनी मी खूप खचले होते रे..
आणि जीवन नकोसे वाटू लागले होते..
अनेक वाईट विचार माझ्या मनात येत होते..
खूप नाउमेद झाले होते मी..
माझ्या मनात सकारात्मक विचार यावेत आणि मला जगण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने ऋषीने मला या केंद्रात दाखल केले..हे ऐकताच समीर जागीच थबकला..
फुलांच्या माळा कलादालनात ठेऊन विजया बाहेर आली..
आणि समीरला म्हणाली..आश्चर्य किंवा दुःख वाटून घेऊ नकोस..
तेव्हाची विजया आणि आता तुझ्या समोर असलेली विजया यांच्यात खूप फरक आहे..
इथून बाहेर पडल्यानंतर तुला सगळी हकीकत सांगेन मी..
तुझ्याही कानावर काही गोष्टी उडत उडत आल्या असतीलच आणि शंका कुशंकांचे वादळ मनात घोंगावत असेल..
तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील..विजया पुढे चालू लागली आणि समीर तिच्या पाठोपाठ निघाला..
चालता चालता ती बोलतच होती..आता मुद्द्याचे सांगते..
साधनाताई ऋषीच्या सिनियर होत्या..
ऋषीने माझी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली..
कारण त्यानंतर ऋषीला दुबईच्या त्याच्या प्रोजेक्टवर सहा महिन्यांसाठी जावे लागणार होते..
त्याची तर इच्छा होती की मी त्याच्या घरी त्याच्या परिवाराच्या निगराणीत राहावे..
पण मला ते योग्य वाटत नव्हते..
म्हणून त्याने नाईलाजाने मला इथे आणले..
इथे आल्यानंतर मी इतक्या अगतिक महिला बघितल्या की माझे दुःख मला त्यांच्यापुढे मोहरीच्या दाण्याइतके वाटू लागले..
आणि मला माझ्या व्यथेतून बाहेर यायला वेळ लागला नाही..
ऋषीच्या अनुपस्थितीत काही अडचण आली तर लोकल गार्डियन म्हणून मी त्याला तुझे नाव नोंदवायला सांगितले होते कारण संस्थेच्या काही ऑफिशियल फॉरमॅलीटीज असतात ज्या त्याला शक्य झाल्या नसत्या..
मला इतर कोणाचीही सहानुभूती किंवा उपकार नको होते म्हणून माझ्या ओठी तुझेच नाव आले..
ESTÁS LEYENDO
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...