आता सगळे होप्स केवळ ऋषीकडूनच होते..
पण त्याचा फोन एन्गेज येत होता..
त्याच्या कॉलची वाट बघत मी चिरागचे अंग वारंवार कोमट पाण्याने पुसत होते..
बेडरूम मध्ये ठेवलेल्या शेगडीत ओव्याचा धूरही केला..
अचानक आठवले की आमच्या लहानपणी आम्हाला रात्रीबेरात्री अचानक ताप आला तर आज्जी तळहात आणि तळपायाला कांद्याचा रस लावायची..
चिरागला ब्लँकेटमध्ये गुंडाळून मी घाईत किचनकडे गेले..
पटकन एक कांदा सोलून तो खलबत्त्यात कुटला..
आसवांच्या धारा लागल्या होत्या..
कांद्यामुळेही आणि माझ्या लेकराच्या काळजीनेही..
इतकी अगतिक याआधी मी कधीच झाले नव्हते..आजचा दिवस माझी खूप कठीण परीक्षा घेण्यासाठीच उगवला होता..
समीरला ब्लॉक केले..
त्याच्यावर अविश्वास दाखवला..
त्याला दुखवले..
नक्कीच त्याची हाय लागली असणार..
आणि त्याचेच हे फळ असेल की काय देव जाणे..
असे भलभलते विचार मनात येत होते..मी ठेचलेला कांदा एका पातळ कापडात बांधून त्याची पुरचुंडी करून आणली..
ती चिरागच्या तळहात आणि तळपायांवर चोळली..
तितक्यात ऋषीचा कॉल आला..
माझ्या जीवात जीव आला..ऋषी: बोल जया.. अगं, केव्हापासून तुला कॉल लावायचा प्रयत्न करतोय.. नेटवर्क इश्युजमुळे तुझा कॉलच लागत नव्हता.. आय वॉज सो वरिड अबाऊट यू.. काय झालंय बाळा.. काही इमर्जन्सी असल्याशिवाय तू मला कॉल करणार नाहीस हे मला माहीत आहे.. सांग बाळा.. काय झालंय..
मी: ऋषी आताच्या आता घरी ये.. चिराग..चिराग.. ( चिरागचे नाव घेताच मी रडायला सुरुवात केली.. मला पुढे काहीच बोलता येत नव्हते..)
ऋषी: ए बाळा.. रडू नकोस.. मी असताना आपल्या चिरागला काहीच होणार नाही.. मी तुझ्या घरापासून फार लांब नाही.. पाऊस थोडा कमी झाला म्हणून मी आता क्लिनिकमधून घरीच चाललो होतो.. मी काही मिनिटात पोहोचतोच..
मी: पण.. पण..
ऋषी: पण काय? डोन्ट वरी यार.. मी येतोय ना..
मी: अरे, कॉलनीचा रस्ता झाड आडवे पडल्यामुळे बंद झालाय.. पॉवरसप्लाय पण कधीपासून ऑफ आहे.. कॉलनीच्या रस्त्यावर पाण्याचे पाट वाहतायत.. तू कसा येशील?
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...