सकाळी उठताच मी आधी समीरला सॉरी असे टेक्स्ट केले..
कारण काल रात्री मी त्याला खूप वेळ ताटकळत ठेऊन स्वतः मात्र झोपून गेले होते..
नंतर माझ्या रूटीन मध्ये मी बिझी झाले..
फोनकडे पाहायलाही वेळ नव्हता..नाश्ता करतेवेळी हेमंतने मला स्पेसिफिक सांगितले की, जया माझे दोन दिवसांचे कपडे आणि ट्रॅव्हलिंग बॅग नेहेमीप्रमाणे रेडी करून ठेव..
आज रात्रीच्या फ्लाईटने बंगळुरूला जावं लागतंय मला..
ॲक्च्युअली माझा कलिग शंतनु जोशी जाणार होता.. पण त्याच्या वाइफला अचानक हॉस्पिटलाईज करावे लागलेय लेबरपेनमूळे..
आणि ज्या प्रोजेक्टसाठी शंतनू जाणार होता त्यावर तो आणि मी दोघेच काम करतोय तर आता मलाच जावे लागेल..
नो ऑप्शन..
म्हणून काल रात्री मी सर्व प्रेझेंटेशन बनवत बसलो होतो..
रात्री तुला बोलतो असतो तर तुझा मूड नेहमीसारखा खराब झाला असता सो नाही बोललो काहीच..हेमंत बोलत असताना माझ्या डोक्यात विचार येत होते..
मूड खराब? नेवर..
उलट त्याचे हे बोलणे ऐकून मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या..
गॉड इज ग्रेट..
कधी एकदा समीरला ही गुड न्यूज ऐकवते असे झाले होते मला..हेमंत ऑफिसला आणि चिराग शाळेत निघून गेल्यावर मी समीरला कॉल केला..
त्याने कॉल रिसिव्ह करताच मी बोलले..
सम्मु........ सम्मु....... गेस द न्यूज!!!
तर समीर घाबरूनच गेला..
जयू, प्लिज असे नको बोलू यार..
आपण तर सर्व प्रिकॉशन घेतले होते ना..
अरे सम्या.. वेट.. वेट..
मला खूप हसू येत होते त्याची तारांबळ बघून..
आणि त्याच्या बालिशपणाची कीव पण येत होती..
अरे बाबा..
न्यूज फक्त तिच असते का? बाकी नसतं का काहीच?..
अरे काल आपण ज्याबद्दल बोलत होतो ना..
ते स्वप्न आजच पूर्ण होणार रे..
आज रात्री तू अन् मी सोबत असणार..
हे सर्व सम्याला सांगताना सुद्धा मला अंगावर शहारे येत होते..
सम्याची रिॲक्शन मला प्रत्यक्ष पहायची होती व्हिडिओ कॉल करून..
पण तो बाईक चालवत होता..
नशिब हे ऐकून आनंदाच्या भरात धडपडला नाही..
जयू.. थांब.. चिमटा काढून बघतो स्वतःला..
हे स्वप्न तर नाही?..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...